शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

चिमुकल्यांच्या रॅम्पवॉकने उपस्थित भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:05 IST

चंद्रपुरात पहिल्यांदाच चिमुकल्यांचा फॅशन शो होत असल्याने शहरातील अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह खचाचच भरले होते.

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंचचा उपक्रम: लोकमत टिष्ट्वंकल स्टारला भरगच्च प्रतिसाद, मन्नन खान जुनिअर प्रिन्स, सिद्धी तोमर जुनिअर प्रिन्सेस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात पहिल्यांदाच चिमुकल्यांचा फॅशन शो होत असल्याने शहरातील अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह खचाचच भरले होते. अनेकांना कुतुहल होते. आपली मुले रॅम्पवॉक करताना बघण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर तो क्षण आला. एका पाठोपाठ चिमुकल्या मंडळींनी मॉडेल्सलाही लाजवेल अशा पद्धतीने रॅम्पवॉक करून उपस्थितांना भारावून सोडले. नृत्याविष्कारातूनही चिमुकल्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते लोकमत बाल विकास मंचच्या वतीने आयोजित टिष्ट्वंकल स्टार २०१७ चा ग्रँड फिनाले सोहळ्याचे.फॅशन शोमध्ये मन्नन खान जुनिअर प्रिन्स, सिद्धी तोनर हिने जुनिअर प्रिन्सेसचा किताब पटकावला. डॉन्समध्ये रश्रीता चव्हाण प्रथम, तर प्राची बहादुरे द्वितीय विजेती ठरल्या.लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करुन या चिमुकल्यांच्या कलाविष्कार सोहळ्याला प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर मनपाच्या महापौर अंजली घोटेकर, शिक्षणाधिकारी(माध्य.) संजय डोर्लीकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मोहित मोबाईलचे संचालक सूरज शर्मा, महाराष्टÑ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, पियुश आंबटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, माजी नगरसेवक संजय वैद्य, इन्स्पायरचे संचालक विजय बदखल, वर्षा कोठेकर, आनंद नागरी सहकारी बँकचे संचालक जितेंद्र चोरडीया, रमण बोथरा, फॅशन शोचे परीक्षक मिस महाराष्टÑ मेघा नाईक, प्रोफेशन मॉडल सानिका सोवाणी, मिस राजस्थान नुतन कोलेवार, डॉन्स स्पर्धेचे परीक्षक जावेद, मृणालिनी खाडीलकर, जिल्हा कार्यालय प्रमुख विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरुणकुमार सहाय मंचावर विराजमान होते.नादयोग कत्थक केंद्राच्यावतीने नर्तकीने गणेश वंदनाने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर नवरात्र ग्रुप डॉन्स यांचा तांडव नृत्य ,पूजा मडावी यांची लावणी तसेच निशांत आणि सुशांत यांचे रॉक परफॉमर्स घेण्यात झाले. बाल कलावंताची नृत्य स्पर्धा चांगलीच रंगली. एकापेक्षा एक सुंदर डॉन्स प्रफार्मन्सने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. लहान मुलांचा फॅशन शो या सोहळयाला उंचीवर नेणारा ठरला. ट्रेडीशनल आणि थिम राऊंडमध्ये मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. रॅम्पवर भविष्यातील स्वप्न परी चालत असल्याच्या प्रत्यय येत होता. फॅशन शोची फोटोग्राफी जिल्हा चंद्रपूर निखील आस्वानी मिस चंद्रपूर स्नेहा कोहळे, ड्रेस डिझायनर आणि मॉलर्स सोनम मडावी यांनी निदेशनात मुलावर रॅम्प वर जल्लोष तयार केला.याप्रसंगी परीक्षकांसह निखील आस्वानी, सोनम मडावी, स्नेहा कोहळे, प्रियंका वरघने, सिद्धी राजा, प्रिती गिडवाणी ऐश्वर्या खोब्रागडे, जिनत पठाण, युक्ता गुगल, इमरान खान, शोहेब पठाण, श्लैश खोबरागडे, पूजा मडावी, महेश काहीलकर, साची कवडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेश भोजेकर यांनी केले. संचालन जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर, युक्ता गुगल, साची कवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद बुले यांनी केले. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.