शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

अपहरण करून बालकाचा खून

By admin | Updated: September 17, 2016 01:31 IST

येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने नेवून खून केल्याची घटना

दुर्गापूर : येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने नेवून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिराने उघडकीस आली. आरोपीने खुनाची कबुली दिली असून वृत्त हाती येईपर्यंत पोलिसांकडून प्रेत ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची होती.सोनु भास्कर सहारे असे या दुर्देवी मुलाचे नाव आहे. त्याचे आईवडील मजुरी करतात. गुरूवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या देवा भुजबळ देवतरे (२२) याने सोनुला चंद्रपुरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी म्हणून बाहेर नेले. विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालते. त्यामुळे घरच्यांनी विशेष काळजी केली नाही. मात्र शुक्रवारी सकाळी सोनुच्या वडीलांना मोबाईलवरून कॉल आला. सोनु आपच्या ताब्यात असून परत हवा असल्यास चार लाख रूपयांची मागणी झाली. त्यामुळे भास्कर सहारे यांनी सायंकाळी दुर्गापूर पोलिसात धाव घेतली. माहितीवरून पोलिसांनी देवा देवतारे याला शोधून काढले व ताब्यात घेतले. अखेर त्याने सोनुचा खून केल्याची कबुली रात्री उशिरा दिली. वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांचा ताफा आरोपीला घेवून सोनुच्या शोधासाठी रवाना होण्याच्या तयारीत होता. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. (वार्ताहर)