शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:22 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा तिढा कायम : रस्ते नाही, दूरध्वनी सेवाही नाही

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.मुकादमगुडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून १२५ घरांच्या वस्तीत ० ते ६ वर्षे वयोगटातील ४९ बालके अंगणवाडी शाळेत दाखल आहेत. १९८७ मध्ये स्थापना झालेल्या अंगणवाडी शाळेची इमारत २००७-०८ मध्ये मानव विकास मिशन योजनेतून मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यात शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. एकीकडे तेलंगणा शासन ती वादग्रस्त १४ गावे आमच्या राज्याची असल्याचा दावा करईत आहे तर दुसरीकडे हीच गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही महाराष्ट्र शासन विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावात महाराष्ट्र शासनाची बस पोहोचली नाही. जायला धड रस्ता नाही, दूरध्वनी सेवा गावात पोहोचल्या नाहीत.मानव विकास मिशन अंतर्गत गावात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र ते बांधकाम अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे आम्हाला कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यातच अंगणवाडी शाळा भरवावी लागते.-यशोधरा सत्यपाल नरवाडे,अंगणवाडी सेविका मुकादमगुडा