शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

ग्रामीण भागांतील मुलांचा इंग्रजी शाळेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:08 IST

आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक आग्रही आहेत. पूर्वी केवळ शहरी भागामध्ये आढळणाऱ्या इंग्रजी शाळा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंटमध्ये अद्यावत ज्ञान मिळते, असा समज पालकांचा असल्याने खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल दिसून येत असल्याने पालकवर्ग हजारो रुपये खर्च करुन आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देत आहे.

ठळक मुद्देमराठी शाळा ओस : शुल्काच्या नावाखाली पालकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक आग्रही आहेत. पूर्वी केवळ शहरी भागामध्ये आढळणाऱ्या इंग्रजी शाळा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंटमध्ये अद्यावत ज्ञान मिळते, असा समज पालकांचा असल्याने खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल दिसून येत असल्याने पालकवर्ग हजारो रुपये खर्च करुन आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देत आहे.शहरी भागात मागील काही वर्षांपासून गलोगली खासगी इंग्रजी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस हे लोन ग्रामीण भागातही पोहचले असून विविध सोईसुविधाचे मोठमोठे बॅनर व जाहिरातीद्वारे पालकांना आकर्षीत करण्यात येत आहे. त्यामुळे पालकवर्गही हजारो रुपये शुल्क देऊन खासगी कॉन्व्हेंटमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत. मात्र प्रत्यक्षात बहुतेक शाळेमध्ये सुविधा नसतानाही शुल्क आकरण्यात येत आहे.अपात्र शिक्षकांचा भरणाकोणत्याही शाखेची पदवी संपादन व इंग्रजी येत असलेल्या अकुशल शिक्षकांचा अनेक इंग्रजी शाळांमध्ये भरणा केलेला आहे डीएड, बीएड, न केलेलें शिक्षक कमी पगारामध्ये मिळत असल्याने संस्था चालकाचेही फावत असल्याने अपात्र शिक्षकांची भरती संचालकांनी केली आहे.विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदीसाठी सक्तीइंग्र्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, गणवेश दफ्तर आदी साहित्य खरेदी करण्याची अट घालतात. मात्र संबंधित दुकानामध्ये सर्व वस्तू महाग विकल्या जात असल्याचा आरोप पालकवर्गांकडून होताना दिसून येतो.