शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडा यांच्या वंशजांचा दिल्लीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:01 IST

इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्र्यांची भेट : हंसराज अहीर यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे. परंतु, या महान सुपूत्रांचे वंशज आज कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, याचे स्मरण मात्र कुणी करत नाही. महान योद्धा, पराक्रमी महापुरूष भगवान बिरसा मुंडा यांचे कुटुंबीय आज अशाच दयनीय अवस्थेला तोंड देत आहेत. ही बाब माहित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबीयास दिल्लीमध्ये आमंत्रित केले व त्यांचा सत्कार केला.पुणे स्थित आदर्श मित्र मंडळ व श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरद्वारा गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना आमंत्रित केले होते. यावेळी बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा व त्यांच्या मुलींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुखराम व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार केला होता. भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करीत ना. अहीर यांनी लोकसभेत त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात आल्याचे यावेळी सांगितले होते.त्यामुळे सुखराम यांनी ना. अहीर यांना विनंती करून संसदेतील ती प्रतिमा बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ना. अहीर यांनी त्यांना दिल्लीत बोलावून भगवान बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर कुटुंबीयांना संसदेतील बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट करून दिली.यावेळी सुखराम यांनी आपली दयनीय परिस्थिती ना. राजनाथ सिंग यांच्यापुढे कथन केली. यावेळी ना. राजनाथ सिंह यांनी सरकार आपल्या समस्यांकडे लक्ष देईल, असे आश्वासन दिले.