शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बाल युवा साहित्य कला चित्रपट महोत्सवाचा समारोप

By admin | Updated: January 18, 2017 00:46 IST

लोकशिक्षण संस्था द्वारे संचालित लोकमान्य कला अकादमीच्या वतीने तीन दिवसीय बाल युवा साहित्यकला चित्रपट महोत्सवाचे आयोजन लोकशिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते.

वरोरा: लोकशिक्षण संस्था द्वारे संचालित लोकमान्य कला अकादमीच्या वतीने तीन दिवसीय बाल युवा साहित्यकला चित्रपट महोत्सवाचे आयोजन लोकशिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते.महोत्सवाचे उद्घाटन ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्ररी’ फेम पुण्याचे अथर्व कुर्वे व इंडियाज बेस्ट ड्रामेबाज चिन्मय देशकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हायोलियन वादक अर्थव भालेराव नृत्यांगना स्वरश्री उपद्रेव रॉक बँड वादक शार्दुल पडगीलवार, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, सचिव श्रीकृष्ण घड्याळ पाटील, डॉ. मिलिंद देशपांडे, श्रवंती देशपांडे आदी उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत कार्तीकची भूमिका करणारा अथर्व कुर्वे याने विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा करताना आपला अनुभव कथन केला. चिन्मय देशकर याने वीर सावकरांच्या जीवनातील एक प्रसंग सादर केला. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज चिन्मय देशकर याने पश्चिमात्य नृत्य सादर केले. चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राकाँ बँड सादर केला. व्हायोलिन वादक अथर्व भालेराव याने कला सादर केली. त्याला तबल्यावर मडावी या बाल कलावंताने साथ दिली.नृत्यांगन स्वश्री उपदेव हिने ‘कट्यार काळजात घुसली’, या सिनेमातील गितावर कथ्यक नृत्य सादर केले. अक्षता नक्षीने व सागर शेंद्रे यांनी कॅनव्हास चित्रे काढली. संचालन प्रा. डॉ. जयश्री शास्त्री व प्रा. डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शन, पटकथा व ध्वनी तंत्र या विषयावर आयोजित परिसंवादात श्याम पेटकर, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, ध्वनी तंत्रज्ञ मंदार कमलापुरकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन राघवेंद्र अडोणी यांनी केले. नागपूर येथील बाल साहित्यिक श्रवंती देशपांडे हिच्या प्रमुख उपस्थितीत कथाकथन व काव्य संमेलनात बाल कवयित्री सोनाली कुपरे, राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मैत्रेयी घनोटे, तीरवंजा येथील श्रुती ताजने, आर्या पिंगे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)