२२ एप्रिल २०२१ रोजी अल्पवयीनांचा बालविवाह होणार असल्याची माहिती बालग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष व मूलचे तहसीलदार रविंद्र होळी, बाल विकास प्रकल्प अधिकारी जगताप यांना मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना दिली. दरम्यान. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर बालविवाह रोखण्याची कार्यवाही सुरू झाली. शिक्षणाधिकारी (माध्य.) विलास नरड यांच्यामार्फत तबालकांच्या वयाचे पुरावे प्राप्त करून पोलीस उपअधीक्षक देशमुख व गोंडपिपरीचे ठाणेदार धोबे, ठाणेदार राजपूत, तालुका बाल संरक्षण समिती मेश्राम व गोंडपिपरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी यांच्या समन्वयातून हा बालविवाह रोखण्यात आला. बालकाला बाल कल्याण समितीसमोर हजर करून बालकाच्या पालकांकडून मुलाचे २१ वर्षे व मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) राजेश भिवदरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, ग्रामसेवक, बाल ग्राम संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST