शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बालरक्षक घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:54 IST

कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. तरीही आणखी काही मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आल्याने शासनाने नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.नव्या निर्णयानुसार मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जवाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने नवीन वेबसाईड तयार केली असून त्यावर बालरक्षकांची माहिती देण्यात येणार आहे.कुणालाही होता येणार बालरक्षकबालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट लागू केलेली नाही. समाजातील कुठल्याही व्यक्तीस बालरक्षक म्हणून काम करणा येणार आहे. सदरील व्यक्तीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्याची माहिती एकत्र करायची आहे. त्यानुसार नजिकच्या शाळेत त्या बालकास प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.मुलांच्या विकासासाठी नवा उपक्रमशाळाबाह्य बालक आढळल्यास त्याला जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांचा विकास होणार आहे. तसेच शाळाचीही प्रगती होणार आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अनेक जिल्ह्यात शाळाबाह्य मुले असल्याचे आढळून आले होते. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात आले होते.