शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली किल्ला स्वच्छतेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:47 IST

इको- प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानासंदर्भात इको- प्रोच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

ठळक मुद्देमदतीचे आश्वासन : इको-प्रोकडून मुख्यमंत्र्यांना चंद्रपूर भेटीचे आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको- प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानासंदर्भात इको- प्रोच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी इको-प्रोच्या शिष्टमंडळाकडून अभियानाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी चंद्रपूर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ल्यास भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी इको-प्रो किल्ला स्वच्छता अभियानचे कौतुक करीत चंद्रपूरला भेट देण्याचे आश्वासन इको - प्रोच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी आमदार नाना शामकुळे, इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको- प्रोच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख रविंद्र गुरनुले, नितीन रामटेके, राजू काहिलकर उपस्थित होते. इको - प्रो संस्थेच्या वतीने मागील वर्षी १ मार्च २०१७ रोजी सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान ५०० दिवस पूर्ण होत आहे. मागील ५०० दिवसांपासून नियमितपणे रोज सकाळी श्रमदान करण्यात येत आहे. किल्ला स्वच्छतेसोबत किल्ला पर्यटनास चालना मिळावी म्हणून इको -प्रोच्यास वतीने ‘हेरीटेज वॉक’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. यास चंद्रपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ल्याची पूर्वीची आणि स्वच्छतेनंतरची छायाचित्रे, वृत्तपत्र बातम्या, किल्ला पर्यटनाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला आणि इतिहास या निमित्ताने नागरिकांना अनुभवास मिळत आहे. संपूर्ण किल्ला स्वच्छता अभियानाची माहिती असलेली पुस्तिकासुध्दा यावेळी भेट देण्यात आली. तसेच अभियानास आवश्यक सहकार्य करण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.