शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत छोरा-छोरीची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:28 IST

दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे.

ठळक मुद्देपेठवॉर्डात कुस्तीचे आयोजन : दंगल चित्रपटाचा प्रत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे. यंदा यात मुला-मुलींची कुस्ती खेळविण्यात आली. हे पाहून अनेकांना दंगल चित्रपटाची आठवण झाली.जय बजरंग गणेश मंडळ पेठवॉर्ड येथे २५-३० वर्षापासून दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन केले जाते. परंतु मुलाविरुद्ध मुलगाच अशाच कुस्ती यापूर्वी पाहावयास मिळत होत्या. यावर्षी मुलाविरुध्द मुलींची कुस्ती खेळविण्यात आली. सर्वांना अंचबित करणाºया या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. कुर्झा येथील प्रांजल धनजोडे या मुलीने कुस्तीत उतरुन एका मुलाला आव्हान दिले. हे पाहून दंगल चित्रपटाची सर्वांना आठवण झाली.मुलींना प्रत्येक क्षेत्रात वाव आहे. त्यांनी त्या दृष्टीने स्वत:ला तयार करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. हे दंगल चित्रपटात दाखविण्यात आले होते. हा संदेश प्रांजलने मनावर घेऊन कुस्तीसाठी तिने स्वत:ला तयार केले. राज्यस्तरावर पोहचण्याची तिची इच्छा आहे. पेठवॉर्डातील या दंगलीत प्रांजलने अखेरपर्यंत एका मुलाला कडवी झुंज दिली. ती शेवटच्या टप्प्यात हरली. परंतु आयोजन मंडळाने तिच्या या धाडसाची नोंद घेत तिचा सत्कार घडवून आणला. यावेळी क्षणभर भावुक वातावरण निर्माण झाले होते. प्रांजल ही आज दंगल हरली असली तरी ती उद्याची चमकणारी तारा आहे, असे अनेकांनी बोलून दाखविले. ब्रह्मपुरी तालुक्यात ती अनेक खेळात राज्य व राष्टÑीय पातळीवर चमकली आहे.कुस्तीतही ती मागे नाही, हे तिने दाखवून दिले.या कुस्तीचे आयोजन ओमसागर उरकुडे, अनंता उरकुडे, शंकर डोईजड, सुभाष उपासे, दिवाकर कुथे, प्रा. किशोर हजारे, सोमेश्वर उपासे, महेश भर्रे, अजय राऊत व जय बजरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.