शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तपाळ योजना सहा दिवसांपासून बंद

By admin | Updated: April 12, 2017 00:54 IST

गेल्या सहा दिवसांपासून नागभीडसह ११ गावांना पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने ...

नागभीड नगरपरिषद : शहराला टँकरने पाणीपुरवठा, महिलांची गर्दी नागभीड : गेल्या सहा दिवसांपासून नागभीडसह ११ गावांना पाण्याचा पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर तोडगा म्हणून नागभीड नगरपरिषदेने टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.तपाळ योजना गेल्या वर्षभरात अनेकदा बंद पडली. पण तेवढा प्रभाव यापुर्वी जाणवला नाही. मात्र आता सूर्य आग ओकत असल्याने प्रत्येकाची पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा दिवसांपासून ही योजना बंद आहे. नागभीड येथील बहुतेक नागरिक तपाळ योजनेवरच अवलंबून असल्याने या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.लोकांची ही गरज लक्षात घेवून नागभीड नगरपरिषदेने ज्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, अशा प्राभागात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. सद्यास्थितीत एकाच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून शहराची व्याप्ती लक्षात घेता आणखी टँकर वाढवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान तपाळ योजनेत निर्माण झालेला तांत्रिक बिघाड आणखी दोन दिवस दूर होणार नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. सद्यास्थितीत निर्माण झालेल्या बिघाडावर थातूर मातूर उपाय न करता कायमस्वरूपी उपाय करूनच योजना सुरू करावी, जेणे करून पुन्हा योजना बंद पडणार नाही, याची खबरदारी तपाळ प्रशासनाने घेण्याची मागणीसुद्धा नागरिकांकडून केल्या जात आहे.सद्यस्थितीत नागभीड येथील प्रभाग क्र. ६ मधील मारीमोहल्ला, सिद्धीविनायक कॉलनी, विठ्ठल मंदिर बाजूचा भाग, प्रभाग क्र. ५ मधील कुरमार मोहल्ला, ठाकरे मोहल्ला, प्रभाग क्र. ४ मधील शिवनगर आदी विविध भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)मिनरल वॉटरची मागणी वाढलीनागभीड येथील बहुतेक कुटुंब पिण्यासाठी तपाळ योजनेच्या पाण्याचा वापर करतात. पण गेल्या सहा दिवसांपासून ही योजना बंद आहे. परिणामी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी मिनरल वॉटरचा पर्याय शोधला आहे. नागभीड येथे मिनरल वॉटरची निर्मिती करणारे तीन प्रतिष्ठाने असून या प्रतिष्ठानांकडून २५ ते ३० रुपये प्रमाणे प्रतिष्ठान पाणी उपलब्ध करून देत आहे.