शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

स्वयंपाक्याकडून विद्यार्थ्यांस मारहाण

By admin | Updated: September 2, 2015 00:47 IST

येथून जवळच असलेल्या रानबोथली येथील उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यास आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकीने मारहाण केल्याची..

मेंडकी : येथून जवळच असलेल्या रानबोथली येथील उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यास आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकीने मारहाण केल्याची घटना २८ आॅगस्टला घडली. या स्वयंपाकीवर कारवाई करण्याची मागणी पालकाकडून होत आहे.सौरभ साईदास बुराडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. सौरभ बुराडे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे २८ आॅगस्टला शाळेत गेला. दुपार पाळीत वर्ग भरत असल्याने सौरभ हा आपल्या मित्रांसोबत शाळेच्या प्रांगणात खेळत असताना, शाळेतील स्वयंपाकीे चांगदेव शेंडे याने तिथे येऊन सौरभला विनाकारक मारहाण करायला सुरूवात केली. या प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि सौरभचे मित्र पळून गेले. घडलेले प्रकरण सौरभच्या वडिलांना माहीत होताच ते शाळेत पोहोचले. मुख्याध्यापक भीमराव पाटील यांच्याकडे सदर घडलेल्या घटनेची चौकशी केली असता, मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम उडवाउडवीचे उत्तरे देऊन शाळेतून हुसकावून लावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी साईदास बुराडे यांनी मारहाणप्रकरणी मुख्याध्यापक भीमराव पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला. तरीसुद्धा मुख्याध्यापक पाटील यांनी माहिती देण्यात टाळाटाळ केली.याप्रकरणी साईदास बुराडे यांनी शिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग दखल घेणार काय, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)मुख्याध्यापक व शाळा समिती सभापतीची चौकशी करण्याची मागणी शालेय शिक्षण समितीचे सभापती दर्शना खरकाटे यांनीही उडवाउडवीचे उत्तर देऊन साईनाथ बुराडे यांना शाळेतून हाकलून लावले. मारहाण झाल्याने साईदास बुराडे यांचा मुलगा सौरभ हा गेल्या चार-पाच दिवसांपासून शाळेत अनुपस्थित आहे. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होत असून याला सर्वस्वी मुख्याध्यापक भीमराव पाटील व शालेय शिक्षण समितीच्या सभापती दर्शना खरकाटे हे जबाबदार आहेत. मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण सभापती यांची उच्चस्तरीय चौकशी करुन योग्य न्याय द्यावा, अशी मागणी साईदास बुराडे यांनी केली आहे.