शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
3
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
4
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
5
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
6
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
7
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
8
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
9
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
10
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
11
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
12
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
14
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
15
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
16
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
17
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
18
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
19
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
20
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य तुटीने स्वस्त धान्य दुकानदार वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

घनश्याम नवघडे नागभीड : सरकारी गोदामातून उचल केलेल्या धान्याच्या प्रत्येक पोत्यातून किमान दोन किलो धान्य कमी येत असल्याची धान्य ...

घनश्याम नवघडे

नागभीड : सरकारी गोदामातून उचल केलेल्या धान्याच्या प्रत्येक पोत्यातून किमान दोन किलो धान्य कमी येत असल्याची धान्य दुकानदारांची ओरड आहे. या प्रकाराने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार चांगलेच त्रस्त झाले आहेत. मात्र, यंत्रणेकडून यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आहे.

शासनाकडून गरीब व निर्धन लोकांसाठी स्वस्त दरात तसेच काही लोकांना मोफत धान्याचा पुरवठा करण्यात येतो. गावागावांत नेमणूक केलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या धान्याचा पुरवठा होतो. तालुक्यात अशा ११८ स्वस्त धान्य दुकानदारांची नेमणूक केली असल्याची माहिती आहे. नागभीड तालुक्यात ३१ हजार ८३५ कार्डधारक आहेत. यातील २८ हजार ३३८ कार्डधारकांना शासनाकडून अन्नधान्न्याचा पुरवठा होत आहे. नागभीड तालुक्याचा विचार करता नागभीड तालुक्यात अंत्योदय योजनेचे ९ हजार ३३२ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ आणि १ किलो साखर देण्यात येत आहे. गहू २ रुपये, प्रती किलो, तांदूळ ५ रुपये तर साखर २० रुपये किलो असे याचे दर आहेत.

धान्य वितरण प्रणालीत प्राधान्य गट हा दुसरा गट आहे. यात १९ हजार ६ लाभधारक आहेत. यात घरातील सदस्य सदस्यसंख्या लक्षात घेऊन धान्य देण्यात येते. या योजनेत एका व्यक्तीस ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अशा ५ किलो धान्यांचा समावेश आहे. कोणतेही धान्य न मिळणारे तालुक्यात ३ हजार ४९७ कार्डधारक आहेत, अशी माहिती आहे.

या स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा शासकीय गोदामातून पोत्यांच्या माध्यमातून करण्यात येतो. तत्पूर्वी पुरवठादार हे धान्य शासकीय गोदामांमध्ये पोत्यांद्वारे जमा करीत असतात. ही पोती कधी फाटलेली असतात. अशा फाटलेल्या पोत्यांमधील धान्य किमान तीन ते साडेतीन किलो कमी असते. पण चांगल्या पोत्यांमधील धान्य दोन किलोंच्या आसपास कमी असते, अशी ओरड स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये आहे. ही बाब स्वस्त धान्य दुकानदार संबंधितांच्या निदर्शनास आणून देतात. पण याकडे मुद्दाम काणाडोळा करण्यात येतो. मात्र या प्रकाराने स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.