शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सूडबुद्धीने कारवाईचे आरोप बिनबुडाचे

By admin | Updated: September 25, 2016 01:25 IST

भद्रावती शहरातील विकासात्मक कामे करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.

पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांचा पलटवारभद्रावती : भद्रावती शहरातील विकासात्मक कामे करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. यादरम्यान, मोहीतकर यांनी सदर कारवाई पक्षपातीपणाने व सुडबुद्धीने केल्याचा आरोप केला. हे संपूर्ण आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी न.प. भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मोहीतकर यांनी निवडणुकीत प्रचार न केल्यामुळे माझे सुडबुद्धीने अतिक्रमण काढले, असा आरोप केला होता. खरे म्हणजे मोहीतकर हे २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे असताना त्यांना फक्त २१ मते मिळाली. अशा व्यक्तीकडून मी काय प्रचाराची अपेक्षा करणार असा प्रश्नही धानोरकर यांनी उपस्थित केला. घुटकाळा, झाडे प्लॉट हा चिचोर्डी ग्रा.पं. काळातील ले-आऊट असून ग्रा.पं. काळापासून त्या ठिकाणी घरे बांधण्यात आली आहे. नगर परिषदेकडून धांडे, कत्तुरवार, मोहीतकर व गुंडावार यांच्या घरासमोरून आर.सी.सी. पाईप नालीचे बांधकाम करण्यात आले होते. त्या नाली बांधकामाच्या समोर रस्त्यापर्यंत पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याने संबंधित नागरिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.त्याचप्रमाणे मोहीतकर हे मूळ ले-आऊटमध्ये भागधारक नसून घर विकत घेतलेले घरमालक आहेत. भद्रावती शहरातील मुख्य रस्त्यावर व विविध वॉर्डातील रस्त्यावर अतिक्रमण केलेले असेल अशा सर्व अतिक्रमणधारकांनी स्वत:चे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे. तसे न केल्यास भद्रावती न.प. प्रशासनाकडून २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे धानोरकर म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)