शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

संविधान सन्मान रॅलीने चंद्रपूरनगरी दुमदुमली

By admin | Updated: November 27, 2015 01:18 IST

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी पं. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान, संविधान सभेचे अध्यक्ष....

शेकडो नागरिकांचा सहभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीचा पुढाकारचंद्रपूर : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पं. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले. याच ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या वतीने संविधान सन्मान दिनानिमीत्य चंद्रपुरातून गुरूवारी संविधान सन्मान रॅली काढली. या रॅलीत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.सकाळी ८ वाजता समता सैनिक दल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुरातील मुख्य मार्गावरुन आंबेडकरी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, सूरज कदम, स्नेहल रामटेके, त्रिरत्न मुन, वैभव रामटेके, आशिष कीर्तक आदींनी केले. राष्ट्रध्वज घेवून बाईक रॅली काढण्यात आली. संविधान सन्मान रॅलीसाठी राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्स प्राय. लिमीटेडचे संचालक सोमेश्वर येलचलवार यांनी वाहतुकीवर निमंत्रणासाठी आपले २५ सुरक्षा रक्षक मोफत उपलब्ध करून दिले. दुपारी १ वाजता संविधान रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप दिवान, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज उचलून रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी भूषविले. संचालन विशाल अलोणे यांनी तर प्रास्ताविक प्रतीक डोर्लीकर यांनी केले. आभार राजेश वनकर यांनी मानले.रॅलीच्या यशस्वीतेकरीता व्ही.डी. मेश्राम, खुशाल तेलंग, सत्यजीत खोब्रागडे, एस.टी. चिकटे, राजु खोब्रागडे, नितीन रामटेके, वामन सरदार, हरीश दुर्योधन, अ.वी. टेंभरे, कोमल खोब्रागडे, बाजीराव उंदीरवाडे, शेषराव सहारे, अशोक फुलझेले, महादेव कांबळे, इ.एस. मेश्राम, राजकुमार जवादे, सिध्दार्थ वाघमारे, रवि मुन, प्रेमदास बोरकर, राजू कीर्तक, तेजराज भगत, रामजी जुनघरे, तथागत पेटकर, मनोज भैसारे यांनी परीश्रम घेतले.(स्थानिक प्रतिनिधी)संविधान हा अमूल्य ठेवासंविधान सन्मान रॅलीनंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमामध्ये डॉ. ए. पी. पील्लई यांनी संविधानातील विविध तरतुदी विषयी मार्गदर्शन करताना संविधान भारतासाठी अमुल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर आधारीत आहे व प्रत्येक भारतीयांसाठी संविधानाच्या तरतुदी असून भारताच्या एकात व अखंडतेसाठी प्रेरक असल्याचे नागपूरवरुन आलेले प्रमुख वक्ते अ‍ॅड. संदेश भालेकर यांनी सांगितले.