शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिनेमामुळे चंद्रपूरची शान वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:36 IST

चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : एमडीआर मॉल व मिरज सिनेमाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे. मिरज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया यांनी अतिशय देखण्या अशा वास्तूची निर्मिती करून चंद्रपूरात पहिल्यांदाच मल्टीप्लेक्स थिएटरर्स सुरू केले. ही बाब चंद्रपूरची शान वाढविणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.चंद्रपूर येथे एमडीआर मॉल अ‍ॅन्ड मिरज सिनेमाचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मिराज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया विराजमान होते. चोरडिया परिवारासह शहरातील गणमान्य मंडळींचीही याप्रसंगी आवर्जून उपस्थिती होती.ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, १९८६ नंतर टेलीव्हिजनचा जमाना आला. त्यानंतर लोक घरातच बसून मनोरंजन करण्यावर भर देत होते. मात्र नंतरच्या काळात सिनेमागृहात चित्रपट बघण्याचा आनंद घरात बसून येत नसल्याचे लक्षात आल्याने लोक थिएटरमध्ये जावू लागले. आता तर इलेक्ट्रीकल उपवासासाठी थिएटरसारखे दुसरे साधन नाही. थिएटरमध्ये बसल्यानंतर तीन तास फेसबूक, वॉटस्अ‍ॅपपासून सुटका झाल्यासारखे वाटते. यामुळे आता पुन्हा थिएटर्सला चांगले दिवस आले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी थिएटरर्स सिनेमा बघायला गेल्यानंतर आलेल्या अनुभवही सांगितले.