शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचे ‘स्वच्छता अ‍ॅप’ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच.

ठळक मुद्देदेशात २८ वा क्रमांक : ‘अ‍ॅप’वरच नोंदविता येते स्वच्छतेबाबत तक्रार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच. शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे. चंद्रपुरातील जवळपास पाच हजार ८३४ मोबाईलधारकांनी ‘स्वच्छता अ‍ॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.२ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरित्या नोंदविता याव्या, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छता अ‍ॅपची सुरुवात करण्यात आली. यात देशभरातील विविध शहरे आपला सहभाग नोंदवितात. सहभागी शहरांच्या स्वच्छतेविषयक कामगिरीचे ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेद्वारे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशभरातील चार हजार ४१ शहरे सहभागी आहेत. स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत.यातीलच एक म्हणजे, शहरातील किती लोकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले, किती लोकांनी कचºयासंबंधी तक्रारी नोंदविल्या, त्या किती वेळेत सोडविण्यात आल्या व तक्रारी निवारणाबाबत नागरिकांचा अभिप्राय काय, हे सर्व स्वच्छता अ‍ॅपवर दिसत असते. सामान्य नागरिकांना आपला परिसर व पयार्याने शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वच्छता अ‍ॅपवर तक्रार करणे, हा आहे.तक्रारीनंतर १२ तासांच्या आत कारवाईशहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिक तक्रार करू शकतात. या कचºयाचा फोटो काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास महानगरपालिकेद्वारे १२ तासांच्या आत त्यावर कारवाई करण्यात येते. तक्रार निवारण केल्यावर त्यावर अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. या तक्रारींचे निवारण योग्यरित्या झाले नसल्यास नागरिक नकारात्मक अभिप्राय नोंदवू शकतात किंवा पुन्हा ती तक्रार उघडू शकतात. जेणेकरुन त्या तक्रारींचे पूर्णत: निवारण करणे महानगरपालिकेला आवश्यक आहे.सुमारे १० हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेचे ध्येय आहे. मनपाचा स्वच्छता विभाग यासाठी सतत कार्यरत आहे. सुमारे २०० अ‍ॅप्स रोज डाऊनलोड केले जात असून यात दररोज सुमारे ४०० तक्रारी व त्यांचे निवारण तसेच ३०० पेक्षा जास्त अभिप्राय नागरिक नोंदवित आहेत.- संजय काकडे,आयुक्त, महानगरपालिका, चंद्रपूर.