शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या ग्रंथदिंडीने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:22 IST

विविध वेशभुषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेशी आकर्षक सजवलेली ग्रंथदिंडी मंगळवारी ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात बघायला मिळाली.

ठळक मुद्देजिल्हा ग्रंथोत्सवाला प्रारंभ : सामाजिक पुरूषार्थ जागविण्यासाठी वाचनाची गरज - गोडबोले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विविध वेशभुषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेशी आकर्षक सजवलेली ग्रंथदिंडी मंगळवारी ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात बघायला मिळाली. ज्युबिली हायस्कूल ते प्रियदर्शिनी सभागृहापर्यंत ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली.ग्रंथदिंडीनंतर चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव २०१७ चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्रीकांत गोडबोले यांनी सामाजिक पुरूषार्थ जागविण्यासाठी वाचन करण्याचे प्रतिपादन केले.सकाळी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक लेखक डॉ. श्रीकांत गोडबोले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महापौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून जाहीर करण्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानीदुपारच्या सत्रात ‘पर्यावरण सद्य:स्थिती व उपाय’ यावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद रंगला. त्यानंतर जेष्ठ कवी प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. तर सांयकाळी वºहाडी झटका हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनाचे उद्घाटन करण्यात आले.आज होणार समारोपबुधवारी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता व्याख्यान, दुपारी १२ ला कवी संमेलन, दुपारी ३ वाजता वादविवाद स्पर्धा तर सांयकाळी ५ वाजता ग्रंथालयात अभ्यास करुन शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सांयकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रम होणार आहे.