बाल विकास मंचचा उपक्रम : रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरणचंद्रपूर : लोकमत बाल विकास मंचतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा चंद्रपूरकरांनी भरभरून आनंद घेतला. ३१ जानेवारी रविवारीला सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व. वामनराव गड्डमवार सभागृहात रंगलेल्या कार्यक्रमात अनेक बाल कलाकारांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केले. त्यामध्ये एकल नृत्य स्पर्धा, युगल नृत्य स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आल्या. एकल नृत्य स्पर्धेत गट ‘अ’ मधून प्रथम क्रमांक जिया राठोड, द्वितीय आर्या करवडे, तृतीय तन्वी लोणारे, तसेच गट ‘ब’ मधून प्रथम राशी फरकाडे, द्वितीय संचिता जेऊरकर, तृतीय रिया बल्की व प्रोत्साहनपर म्हणून संस्कृती माकोडे, संचिता भोयर, अभय धनमने, लतिका कुमरे, प्रतीक्षा मेश्राम, तन्वी नार्लावार यांनी बाजी मारली.युगल नृत्य स्पर्धेत गट ‘अ’ मधून प्रथम राधिका आणि दिव्यानी, द्वितीय राज आणि नीरज, तृतीय प्रियंका आणि प्रतीक्षा तसेच गट ‘ब’ मधून प्रथम संचिता आणि तन्वी, द्वितीय मानसी आणि सायुरी, तृतीय कार्तिक आणि जय ग्रुप, प्रोत्साहनपर म्हणून शर्वरी खंडाळकर ग्रुप, प्रतीक निंबाळकर, आदित्य भालेराव, अभिषेक आणि राज, आकाश आणि सुरज, स्वप्नील आणि ओम यांनी क्रमांक पटकाविले. तसेच एकपात्री अभिनय स्पर्धेत गट ‘अ’ मधून प्रथम क्रमांक वृषभ मेश्राम, द्वितीय दीपक, तृतीय क्रिश. गट ‘ब’मधून प्रथम राशी फरकाडे, द्वितीय साक्षी गुंडावार, तृतीय आदित्य भालेराव व प्रोत्साहनपर म्हणून खुशी येरणे व प्रथमेश जिवतोडे यांनी क्रमांक पटकावले. एकल नृत्य व युगल नृत्य स्पर्धेचे परीक्षण चंद्रपुरातील नृत्य शिक्षक जावेद व प्रशांत यांनी केले. तसेच एकपात्री अभिनय स्पर्धेचे परीक्षण मुन्ना गेडाम (फिनिक्स साहित्य मंच) व नितेश यांनी केले. बक्षीस वितरणाला महेश कानिटकर उपस्थित होते. संचालन प्रशांत गहाणे व बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक सुरज गुरनुले यांनी केले. महेश गाजेवार व अनुप यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
बाल कलाकारांच्या नृत्याने चंद्रपूरकर झाले मंत्रमुग्ध
By admin | Updated: February 10, 2016 01:02 IST