शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

सुमधूर गीतांच्या तालावर थिरकले चंद्रपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:22 IST

चित्रपटांपासून भावगीतांपर्यंत आणि आधुनिक ते पारंपरिक गीतसंगीताच्या तालावर पाऊल थिरकले नाही, तर ती तरुणाई कसली? चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक धर्मेश आणि नृत्यकलावंत शेखरकुमार, कुमार शेट्टी यांच्या उपस्थितीने स्पर्धकांसोबतच उपस्थित रसिक नृत्यमनाचा फुलोरा फुलला.

ठळक मुद्देइंडिया डान्सिंग सुपरस्टार स्पर्धा : नटराज डॉन्स आणि लोकमत बालविकास मंचचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चित्रपटांपासून भावगीतांपर्यंत आणि आधुनिक ते पारंपरिक गीतसंगीताच्या तालावर पाऊल थिरकले नाही, तर ती तरुणाई कसली? चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक धर्मेश आणि नृत्यकलावंत शेखरकुमार, कुमार शेट्टी यांच्या उपस्थितीने स्पर्धकांसोबतच उपस्थित रसिक नृत्यमनाचा फुलोरा फुलला. निमित्त होते इंडिया डॉन्सिंग सुपरस्टार स्पर्धा... सुप्त कलागुणांना बहर यावा, यासाठी नटराज डॉन्स इन्स्टिट्युट, लोकमत बाल विकास मंच आणि कुवर टिकमंचद ज्वेलर्स यांच्या पुढाकारात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेतील नृत्यकलेने रसिकांच्या आनंदाला उधाण आले होते.प्रमुख पाहुणे म्हणून टिकमचंद ज्वेलर्सच्या संचालिका तपस्या सराफ, शुभाष शिंदे, रघुवीर अहिर, राधेश्याम अडानिया, डॉ. मंगेश गुलवाडे, नितीन पुगलिया, छबुताई वैरागडे, प्रदीप रामटेके, पौर्णिमा बावणे, शिवम त्रिवेदी, कमल अलोणे, दिलीप गुरुवाले, भीमराव आत्राम, गौरव उपगणलावार, त्रिशांत कुमरे, नटराज डॉन्स इन्स्टिट्युटचे संचालक अब्दुल जावेद आदी उपस्थित होते.दीप प्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात झाली. नटराज डॉन्स इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी अब्दुल जावेद यांना भेटवस्तु देऊन सत्कार केला. दरम्यान, नृत्यदिग्दर्शक धर्मेश यांचे आगमन होताच रसिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. युवापिढीतील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक धर्मेश यांनी दिलखेचक नृत्य सादर करून वाहवा मिळविली.स्पर्धेतील सहभागी कलावंतांनीही बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंग भरला. १५ आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील कलावंतासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. सुपर मॉम आणि ग्रुप डॉन्समध्ये ४ गट तयार करण्यात आले.कलावंतांनी नृत्यकलेचे सादरीकरण करून रसिकांना जिंकले. कलावंतांच्या आयु्ष्याला आकार देणाºया उपक्रमाची मान्यवरांनी प्रशंसा केली. आयोजनासाठी सुरज पेंदाम, सचिन धोतरे, राहुल उपरे, विक्रांत आले, गणेश पायघण, गौरव फंदी, प्रेम सरसार, पवित्रा गौन, शुभांगी काळे, सुष्मा नगराळे, प्रियंका गिरडकर, युगंधरा आत्राम, विना खोब्रागडे, रुपाली धकाते, मीनाक्षी पानपटे, वसुधा गावतुरे, पुर्वजा गुरूवाले, अक्षता ठाकरे आदींनी सहकार्य केले.संचालन प्रसिद्ध निवेदक नासिर खान व व्ही. जे. मान यांनी केले. उपक्रमाला नटराज डॉन्स इंस्टिट्युट लोकमत ईव्हेंट चमूने सहकार्य केले.स्पर्धेतील विजेते१५ पेक्षा कमी वयोगटातील सोलोप्रथम- त्रिशा उराडे, द्वितीय- चाहत शेख, तृतीय- भक्ती मेहता१५ पेक्षा अधिक वयोगटातील सोलोप्रथम- सागर दास, द्वितीय- प्राची प्रजापदी, तृतीय- प्राजक्ता उपरकरसुपर मॉमप्रथम- रश्मी देशमुख, द्वितीय- ज्योती मेहता, तृतीय - नीना नगराळेग्रुप डॉन्सप्रथम- डी १ ग्रुप नागपूर, द्वितीय एफडीए ग्रुप नागपूर, तृतीय- भोपाली सिस्टर भोपाळ.विजेत्यांना संधी देवूचंद्रपुरातील नृत्यस्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रतिभा आहे. या स्पर्धकांना आगामी डॉन्स प्लस स्पर्धेमध्ये प्रथम आॅडिशन देण्याची गरज नाही. कलावंतांमध्ये प्रचंड क्षमता असून करिअरला दिशा देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त असून, ग्रामीण भागातील कलावंताच्या प्रगतीसाठी मी सतत सहकार्य करणार आहे.- धर्मेश, नृत्य दिग्दर्शक