शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

राष्ट्रीय एकतेसाठी उत्स्फूर्तपणे धावले चंद्रपूरकर

By admin | Updated: November 1, 2014 01:41 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.

चंद्रपूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमीत्याने आयोजीत ‘रन फॉर युनिटी’ दौडमध्ये चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, युवक- युवती, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व प्रशासकीय अधिकारी राष्ट्रीय एकतेसाठी उत्स्फूर्तपणे धावले. दौडचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. दौडमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, आयुक्त (कस्टम) प्रिती चौधरी, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी, डॉक्टर, वकील व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभाग नोंदवला.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला होता. त्यानिमित्त चंद्रपूर येथे रन फॉर युनिटी दौड घेण्यात आली. पोलीस मुख्यालय येथून सुरु झालेल्या दौडचा जटपूरा गेट मार्गे पोलीस मुख्यालय या ठिकाणी समारोप करण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या दौडला हिरवी झेंडी दाखविली. दौडमध्ये वरिष्ठ नागरिक पुरुष, महिला, खुला गट व शाळकरी मुला-मुलींचा गट आदींनी सहभाग घेतला होता. दौड नंतर पोलीस परेड ग्राऊंड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पाजंली अर्पण करुन एकतेची सामूहीक शपथ घेण्यात आली. भारताची अखंडता व एकता आबाधीत ठेवण्यासाठी ही शपथ देण्यात आली.पोलीस परेड ग्राऊंड येथून पोलीस परेड काढण्यात आली. जटपूरा गेट ते परत पोलीस परेड ग्राऊंड असे परेड संचालन करुन पोलीस विभागाने राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने वल्लभभाई पटेल यांना सलामी दिली.राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, डॉक्टर, वकील, वनविभाग, इंडियन मेडिकल असोशिएशन, इकोप्रो, शाळा महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपविभागीय अधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक शेख व प्रशांत आर्वे यांनी स्पर्धेतच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निंबध, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान घेण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)