शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:28 IST

कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : सिपेटमार्फत वर्षभरात १७०० मुलांना महानगरांमध्ये नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून होणार असल्याचा आपणास विश्वास असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.चंद्रपुरात केंद्रिय केमिकल अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या सिपेट या कॉलेजमार्फत ‘प्लेसमेंट’ करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीपेटच्या अभ्यासक्रमाला चंद्रपूरमध्ये सुरुवात करण्यात आली. संपूर्ण भारतात ३१ शहरांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि चंद्रपूर या दोन शहरांमध्ये सिपेटच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाते. सहा महिन्यांचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. २०१४ पासून आतापर्यंत चंद्रपूरच्या सिपेट या संस्थेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई येथे टाटा, पॉलिमर एलजी, इंदोर कंपोझिट आदी प्लॉस्टिक कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. ही सर्व मुले प्लास्टीक प्रोसेसिंग मशीन आॅपरेटर म्हणून या कंपन्यांमध्ये रुजू झाली असून त्यांना प्रमाणपत्र भेटल्यानंतर लगेच नोकरी मिळाली आहे. या सर्वांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी काल स्थानिक एका हॉटेलमध्ये प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, राहुल सराफ, खुशाल बोंडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना संबोधित करताना ना. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले. त्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. या संस्थेसाठी एक अद्यावत इमारत लवकरच उभारली जाणार आहे.