शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन

चंद्रपूर : महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यापैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर असला तरी टक्केवारी बघता फक्त ८७.५ आहे. साक्षरतेचे सर्वाधिक कमी प्रमाण अतिदुर्गम समजल्या जाणारा जिवती तालुक्यात आहे.जिवती तालुक्यात ७५.५ टक्के लोक साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुद्धा चंद्रपूर जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षणाचे कार्यालय जिल्ह्यात उघडून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रुपये आतापर्यंत खर्च केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा साक्षरतेने परिपूर्ण व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा संवेदनशिल नसल्याची बाब समोर आली आहे. आजच्या स्थितीत १४ तालुक्यामध्ये वरोरा ८४, चिमूर ७७.४, नागभीड ७६.५, ब्रह्मपुरी ७८, सावली ७०.१, सिंदेवाही ७६.८, भद्रावती ८४.२, चंद्रपूर ८७.५, मूल ७१.८, पोंभूर्णा ७०.५, बल्लारपूरर ८४.४, कोरपना ८१.१, राजुरा ७८.९, गोंडपिंपरी ७२, जिवती ६५.५ एवढी टक्केवारी साक्षरतेची आहे. विशेष म्हणजे, साक्षरतेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त प्रमाणात आहे. जिवती तालुक्यात ५५.२ टक्के स्त्रिया साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात ८६.८ पुरुष साक्षर असून ७३.० स्त्रिया साक्षर आहेत. ग्रामीण भागात ८३.७ टक्के पुरुष तर शहरी भागात ६७.१ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. शहरी भागात पुरुष ९२.२ टक्के तर ८३.७ स्त्रिया साक्षर आहेत. साक्षरता अभियान अनेक वर्षांपासून राबवूनसुद्धा साक्षरता अभियानाचे फलीत झाले नसल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा शासनाला साक्षरता अभियान राबवावे लागणार असे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)