लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारत स्वतंत्र झाला तरी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आणखी बाकी असून महिला बचत गटांमार्फत ५० टक्के समुदायांना आर्थिक संपन्न बनविणे हे या बचत गटाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, त्यासाठी आवश्यक ती मदत शासनस्तरावरून केली जात आहे. या चळवळीमध्ये माझा गृह जिल्हा असणारा चंद्र्रपूर हा जगाच्या पातळीवर सर्वात उत्तम जिल्हा म्हणून पुढे यावा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापौर अंजली घोटेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती शितल गुरनुले, चंद्र्रकला सोयाम, माजी महापौर राखी कंचर्लावार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांच्यासह मनपाच्या नगरसेविकांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सेवा सप्ताह चालू असून त्यामध्ये महिला बचत गट महामेळावा आयोजित करण्यात आला होता.पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक शाळा तुकुम येथे चंद्रपूर महानगरातील महिला बचत गटांचा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सक्षम बचत गटांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सक्षम बचत गटांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बचत गटांचा मेळावा