शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य

By साईनाथ कुचनकार | Updated: August 28, 2023 18:48 IST

Chandrayaan 3 : भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली चंद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेमध्ये विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लँडिंग झाले.

- साईनाथ कुचनकार चंद्रपूर - भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली चंद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेमध्ये विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लँडिंग झाले. त्यामधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील माहिती इस्रोकडे पाठविणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मार्गक्रमण करण्यासाठी रोव्हरला लागणाऱ्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. या पॅनलच्या निर्मिती प्रक्रियेत योगदान दिलेल्या टीममध्ये चंद्रपूरच्या शर्वरी शिरीष गुंडावार हिचा सहभाग होता. तिची ही कामगिरी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे.

शर्वरी ही मूळची चंद्रपूर येथील असून श्वेता व शिरीष गुंडावार यांची मुलगी आहे. ती सध्या बंगलोर येथे इस्रोच्या मुख्यालयात (युआरराव सॅटेलाइट सेंटर) येथे वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहे. शर्वरीची आई श्वेता गुंडावार या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, वडील शिरीष गुंडावार व्यावसायिक आहेत.

अगदी लहानपणापासूनच शर्वरी अभ्यासात हुशार होती. तिने प्राथमिक शिक्षण चंद्रपुरातील डॉन इंग्लिश स्कूल येथे झाले. ्दहावीपर्यंतचे शिक्षण तिने नारायणा विद्यालयातून पूर्ण केले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण बुटीबोरी येथील इरा इंटरनॅशनल स्कूल येथून घेतले. त्यानंतर फ्युचर विस्टा या संस्थेकडून कोचिंग घेतले. केरळमधील त्रिवेंद्रम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) येथून बी. टेक. पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिची इस्रोमध्ये वैज्ञानिक या पदावर निवड झाली आहे. चंद्रावर गेलेल्या चंद्रयान-३ या मोहिमेत शर्वरीचा सक्रिय सहभाग आहे. प्रज्ञान रोव्हरसाठी लागणारे सौर पॅनल बनविणाऱ्या पथकामध्ये तिने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शर्वरीचे लहानपणापासून वैज्ञानिक होण्याचे स्वप्न होते. आता चंद्रयान मोहिमेत तिने ऊर्जा निर्मितीच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. तिने घेतलेल्या शिक्षणाचा देशसेवेसाठी उपयोग झाला. यापुढेही असेच कार्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे.- प्रा.श्वेता शिरीष गुंडावारशर्वरीची आई

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3