शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या सन्मानासाठी बंद राहिले चंद्रपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:38 IST

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.

ठळक मुद्देउत्स्फूर्त आणि कडकडीत३० व्यापारी संघटनांचा सहभागपाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.यात शहरातील ३० व्यापारी संघटनांचा सहभाग होता. बंददरम्यान व्यापाºयांनी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले.पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सने एक तातडीची बैठक घेतली. यात कॅन्डल मार्च काढणे, व्यापारपेठ बंद ठेवणे व निधी गोळा करून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यानुसार रविवारी सायंकाळी ६ वाजता सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्रित आले.त्यानंतर तिथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. हा कॅन्डल मार्च जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आला व तिथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील शेकडो नागरिकही सहभागी झाले होते.त्यानंतर सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच एक-दोन किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता चंद्रपुरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंगाली कॅम्प, गिरनार चौक, गांधी चौक, रामनगर, बाबुपेठ, बागला चौक, पठाणपुरा आदी परिसरातील बाजारपेठा बंद होत्या. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद यशस्वी करीत शहिदांना श्रध्दांजली अर्पित केली. यावेळी नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दर्शविली.बाईक रॅलीसकाळपासून व्यापारपेठ बंद ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांनी गांधी चौकातून बाईक रॅली काढली. गांधी चौक ते जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट व जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही बाईक रॅली फिरली. दरम्यान, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात आले. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, दिनेश बजाज, अविनाश बुक्कावार, विवेक पत्तीवार, चंद्रकांत उमाटे, रितेश वर्मा, सुनील शुक्ला, चिंटू पुगलिया आदी उपस्थित होते.बाजारपेठेत शुकशुकाटया बंददरम्यान, मुख्य रस्त्यावरील दुकानांसह गल्लीबोळातील लहान-सहान दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. चहा टपरी, पान टपऱ्यादेखील बंद होत्या. एरवी चंद्रपुरातील गंजवॉर्ड, गोकूल गल्ली, गोलबाजार, गांधी चौक या ठिकाणी बाजारपेठत रेलचेल असते. मात्र सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.नागभीडमध्ये कडकडीत बंदनागभीड : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा नागभीड येथे कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. नागभीड येथील सर्व राजकीय पक्ष, संस्था एकत्रित आले. व्यापाºयांनीही आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नगर परिषदेच्या ओट्यापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत सर्वच विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.