शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

चंद्रपूर : चंद्रपुरातील गौतम नगरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कारवाईनंतर ...

चंद्रपूर : चंद्रपुरातील गौतम नगरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कारवाईनंतर देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणा राज्यांतील तीन मुलींची सुटका करण्यात आली.

शहरातील गौतमनगर परिसरात अनेक वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय चालतो. या व्यवसायात अनेक महिला व मुलींचा समावेश आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा राज्यांतील मुलींकडून चंद्रपूर शहरातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पथक केले. पथकाने चौकशी सुरू केली असता शहरातील गौतमनगर भागात तीन मुली देहविक्रीच्या व्यापारात अडकल्याची बाब पुढे आली. या मुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार केंद्र येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना या व्यापारात ओढणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागात देहविक्री सुरू आहे, याबद्दल अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक खाडे यांना दिले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक पुसाटे, नियंत्रण कक्षासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, सहायक फौजदार नितीन जाधव, संजय आतकुलवार, सुधीर मत्ते, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.