शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर पोलिसांनी रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:46 IST

शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच घटना तंबी देऊन पालकांना सोडून दिले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला.लालपेठ येथे एका १४ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच लग्नमंडप गाठले. पोलीस लग्नमंडपात दिसताच सारेच स्तब्ध झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच अजय साखरकर, समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात प्रिया पिंपळशेंडे यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून दंड आणि शिक्षेची तरतूद असल्याची माहिती संबंधिताना देण्यात आली. यावेळी मुलीच्या पालकासह तिच्या नातेवाईकांनी मुलीचे वय १८ वर्ष झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी हमी दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर शहरचे एपीआय ठाकूर, पीएसआय नागपूरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर, समुपदेशक प्रिया पिंपळशेंडे, नगरसेवक बंटी परचाके यांनी हे प्रकरण हाताळले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी