शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘चंद्रपूर पोलीस’ अपडेटच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ हे ब्रिद जोपासणाऱ्या चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाची ‘चंद्रपूर पोलीस’ ही साईट अपडेट करून त्यामध्ये नवनियुक्त अधिकारी व त्यांचे नंबर नोंद करणे गरजेचे होते. मात्र पंधरवड्याचा कालावधी होत असतानाही पोलीस विभागाची ही साइट अपडेट करण्यात आली नाही. या साइटवर अद्यापही तत्कालीन पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांचीच नावे व नंबर दिसून येत आहेत.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यातील ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ हे ब्रिद जोपासणाऱ्या चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाची ‘चंद्रपूर पोलीस’ ही साईट अपडेट करून त्यामध्ये नवनियुक्त अधिकारी व त्यांचे नंबर नोंद करणे गरजेचे होते. मात्र पंधरवड्याचा कालावधी होत असतानाही पोलीस विभागाची ही साइट अपडेट करण्यात आली नाही. या साइटवर अद्यापही तत्कालीन पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांचीच नावे व नंबर दिसून येत आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा असेल तर कुणायला करायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. आपत्कालीन स्थितीत संबंधित ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करता यावा, यासाठी जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने ‘चंद्रपूर पोलीस’ ही साइट तयार करण्यात आली आहे. ‘सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी’ असे याचे ब्रिद आहे. या साइटवर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस विभागातील सर्व शाखा, सर्व पोलीस स्टेशनमधील ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक यांचे नाव व मोबाइल नंबरची नोंद असते. आपत्कालीन स्थितीत त्या साइटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होते. मागील पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यातील ठाणेदारांची खांदेपालट करण्यात आली. पडोली, रामनगर, भद्रावती, चिमूर, गडचांदूर, गोंडपिंपरी, भिसी, शेगाव येथील पोलीस निरीक्षकांची बदली झाली. येथे नवे पोलीस निरीक्षक रुजूही झाले आहेत. मात्र अद्यापही ‘चंद्रपूर पोलीस’ ही साइट अपडेट करण्यात आली नसल्याने या साइटवर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचेच नाव व नंबर दिसून येत आहे. त्यामुळे  अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास   अडचण जात असल्याने ही साइट अपडेट करण्याची मागणी होत आहे.  अनेक ठाण्यातील लॅण्डलाइन बंद- चंद्रपूर जिल्ह्यात ११ जिल्हास्तरीय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच ३४ पोलीस स्टेशन आहेत. मात्र बहुतांश कार्यालयातील लॅण्डलाइन बंद आहे. त्यामुळे जर आपत्कालीन स्थितीत पोलीस विभागाला मदत मागायची असेल तर कुठे संपर्क करायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे नादुरस्त लॅण्डलाइन बदलविण्यात यावे किंवा पर्यायी नंबरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस