शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी

By admin | Updated: March 18, 2017 00:41 IST

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला.

नरेश पुगलिया : निवडणूक आयोगाला निवेदन चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिेलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकाबरोबरच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. तर गोव्यामध्ये ईव्हीएम मशीनसोबत वीवीपीएटीचा वापर करण्यात आला. मात्र उत्तरप्रदेश व उत्तरांचल प्रदेशातील निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएमद्वारे मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी असल्याचा आरोप केला. गोव्यामध्ये मतदान करताना आपले मत कोणाला दिले हे स्क्रीनवर दिसत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला १३ जागा मिळविता आल्या. मात्र उत्तर प्रदेश व उत्तरांचल प्रदेशामधील निकाल अनपेक्षीत असल्यामुळे लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनबाबत लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)ईव्हीएम बचाव लोकशाही आघाडीचे निवेदनचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची होणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करावा, या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ईव्हीएम बचाव लोकशाही आघाडीसह विविध पक्ष तसेच विविध संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारी बहुतेक जनता अल्पशिक्षीत आहे. त्याना ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करणे अडचणीचे जात आहे. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये पसंतीच्या उमेदवाराला मत जात नसल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे मताधिकाराचा योग्य वापर करता यावा, यासाठी मनपा निवडणुकीमध्ये मतपत्रिकेचा वापर करावा, निवडणुकीच्या काळात प्रालोभणे देणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यात याव्या. प्राचारातील खर्चावरील मर्यादा काटेकोरपणे पाळण्यात याव्या, निवडणूक प्रचारात धार्मिक बाबींचा प्रचार होऊ नये, किंवा उमेदवाराद्वारे धार्मिक कार्यक्रम होऊ नये या मागण्याचा समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रिपब्लिकन संघर्ष समितीचे अंकुश वाघमारे, माजी नगरसेवक अशोक रामटेके, महाराष्ट्र आॅफीसर्स फोरमचे शंकरराव सांगोरे, धृव करमरकर, बसपाचे जिल्हा सचिव राजू देवगडे, जितेंद्र डोहणे, संजय कन्नावार, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे अध्यक्ष महेंद्र लोखंडे, शिवराज्य पक्षाचे रामकुमार अवकापल्ली आदी उपस्थित होते.