शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Chandrapur Gram Panchayat Result : ग्राम पंचायतींवर भाजप व काँग्रेसचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 13:46 IST

९२ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल; राजकीय पक्षांचा दावा, ग्रामस्थ संभ्रमात; गुलाल उधळत केला जल्लोष, गावागावांत राजकीय चर्चा

चंद्रपूर : जिल्ह्यात ९२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. त्यानंतर सोमवारी सकाळपासून संबंधित तहसील कार्यालय परिसरात मतमोजणी करण्यात आली. यावेळी सरपंचांची थेट निवडणूक असल्याने राजकीय पक्षांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या ग्रामपंचायतींमध्ये भाजपने काही ठिकाणी विविध पक्षांसोबत युती करीत ४७ जागा जिंकल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसनेही ३९ जागांवर आपले उमेदवार आल्याचे म्हटले आहे. शेतकरी संघटना १५, राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांवर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने दोन जागांवर दावा केला आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीनेही काही जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यात १० अपक्षांनी सरपंचपद मिळविले आहे. राजकीय पक्षांच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे सामान्य नागरिक मात्र संभ्रमात पडले आहेत.

सोमवारी सकाळपासून तालुकास्तरावर मतमोजणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उमेदवारांसह गावागावातील नागरिकांनी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. विविध राजकीय पक्ष सरपंच पदावर आपला दावा करीत आहेत. विशेष म्हणजे, सरपंच एका पार्टीचा आणि अन्य सदस्य दुसऱ्याच पार्टीचे असेही अनेक गावांमध्ये उदाहरण बघायला मिळत आहे. आज राजकीय पक्षांनी दावे केले असले तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

राजुरा विधानसभा क्षेत्रात राजुरा, कोरपना आणि जिवती येथे पार पडलेल्या एकूण ८४ ग्रामपंचायत निवडणुकीत ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर काँग्रेसने दावा केला आहे. याशिवाय बहुतांश ठिकाणी सर्वाधिक सदस्य काँग्रेसचेच निवडून आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

यात राजुरा तालुक्यातील ३० पैकी काँग्रेस - १५, भाजप - ९, शेतकरी संघटना - ३, गोंडवाना- १, शिवसेना - १, अपक्ष - १, कोरपना तालुक्यातील २५ पैकी काँग्रेस - १४, भाजप - ३, शेतकरी संघटना - ३, अपक्ष - १, जिवती तालुक्यातील २९ पैकी काँग्रेस - १४, भाजप - ७, शेतकरी संघटना - १, वंचित - २, राष्ट्रवादी - १, गोंडवाना - ३, भाजप गोंडवाना - १ असा निकाल जाहीर झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असून, एकूण ८४ पैकी ४३ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. क्षेत्रात आपण करीत असलेल्या विकासकामाला जनतेने दिलेला हा आशीर्वाद आहे. हा विजय काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित आहे.

- सुभाष धोटे, आमदार, राजुरा विधानसभा.

मूल तालुक्यात काँग्रेसचा दोन तर भाजपाचा एका ग्रा. पं.वर विजय

मूल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. सोमवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने ताडाळा, टोलेवाही या दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळवत वर्चस्व कायम ठेवले तर भगवानपूर ग्रामपंचायतवर भाजपने विजय मिळविला.

चिमूर तालुक्यात दोनवर भाजपचा तर एका ग्रा.पं.वर अपक्षाचा दावा

चिमूर तालुक्यातील खडसंगी, मदनापूर व नवेगाव या तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात पार पडली. निकालानंतर खडसंगी, मदनापूर या दोन ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित पॅनलचे सरपंच विजयी झाले, तर नवेगाव या ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन ग्रामविकास आघाडी पॅनलचे सरपंच विजयी झाले आहेत.

सावरीत शिवसेना, तर पिरलीत भाजपचा झेंडा

भद्रावती तालुक्यातील सावरी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी शरद महादेव शिरकुरे यांचा दणदणीत विजय झाला असून, शरद शिरकुरेसह सातपैकी चार सदस्य शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) निवडून आल्याचा दावा शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू पढाल, शहरप्रमुख घनश्याम अस्वले, विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर डुकरे, युवासेना तालुकाप्रमुख महेश जीवतोडे, तालुका संघटक बाळाभाऊ क्षीरसागर, उपतालुकाप्रमुख राहुल मालेकर यांनी केला आहे. पिरली ग्रामपंचायतीवर सरपंचपदी भाजप समर्थित पॅनलच्या वर्षा विजय तराळे या विजयी झाल्या आहेत.

जिवती तालुक्यातील निकालावर पक्षांचे दावे-प्रतिदावे

जिवती तालुक्यात २९ ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. येरमी येसापूर, मरकलमेटा, आसापूर, धोंडाअर्जुनी, गुडशेला, नोकेवाडा, केकेझरी, दमपूर मोहदा, देवलागुडा, चिखली (खु.), टेकामांडवा, माराई पाटण, भारी, शेडवाही (बाबापूर), सोरेकासा, शेणगाव, राहपल्ली (ख.), मरकागोंदी, भोक्सापूर, आंबेझरी, पिट्टीगुडा क्र. १, पिट्टीगुडा क्र. २, पाटण, चिखली (बु.), खडकी हिरापूर, पुनागुडा या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. मतमोजणीनंतर काँग्रेसने १३, भाजपाने ११, गोंगंपाने ९, वंचितने १, राष्ट्रवादी काँग्रेसने २, तर शेतकरी संघटनेने एका जागेवर आपला दावा केला आहे. 

ब्रह्मपुरी : एका ग्रामपंचायतीची निवडणूक होती. ही ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकली.

तालुकानिहाय ग्रामपंचायती

जिवती - २८

राजुरा - ३०

कोरपना - २५

भद्रावती - २

चिमूर - ३

ब्रह्मपुरी - १

मूल - ३

एकूण - ९२

७८.०७ टक्के मतदान

जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. २८१ मतदान केंद्रांतून ८८ हजार ७६० नागरिकांनी आपला हक्क बजावला. या मतदानाची ७८.७ टक्केवारी आहे. यामध्ये ४१ हजार ८७१ महिला, तर ४६ हजार ८८९ पुरुष मतदारांनी मतदान केले.

डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ३६० ग्रामपंचायतींवर विजय मिळविला होता. यावेळी ४० ग्रामपंचायतींवर भाजप, तसेच सात ग्रामपंचायतींवर युतीमध्ये विजय मिळविला आहे. नागरिकांनी भाजपला कौल दिला आहे.

- देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला आहे. ४८ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील ग्राम पंचायतीचे सर्वाधिक सरपंच व सदस्य काँग्रेसचे निवडून आहे आहेत.

- प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी (ग्रामीण)

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ ग्रामपंचायतींवर सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. एवढेच नाही तर अनेक ग्रामपंचायतींवर सदस्य निवडून आले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत निवडणूक युती न करता स्वतंत्र्यपणे लढली.

- राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

ग्रामविकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या लढाईत शेतकरी संघटनेला चांगला प्रतिसाद मिळाला. विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य हे शेतकरी संघटनेचे निवडून आले आहेत. बहुतांश मतदार हे येथील स्थानिक सत्ताधारी नेतृत्वाच्या विरोधात जाताना दिसत असल्याचे मतदारांच्या कौलावरून दिसते.

- ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, माजी प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवस