शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेंशन योजनेसाठी चंद्रपुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जुनी पेंशन योजना बंद करुन शासनाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केल्यामुळे ...

ठळक मुद्देजिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुनी पेंशन योजना बंद करुन शासनाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षितता नाही. त्यामुळे ही योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना बंद करुन नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र ही योजना फसवी व कर्मचारीविरोधी असल्याने जुना पेंशन योजना सुरु करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने वतीने केली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होती. मात्र शासनाने ३१ आॅक्टोबर २०१५ रोजी नवे परिपत्रक काढून १ नोव्हेंबर २००५ नंतर महाराष्ट्र सरकारच्या सेवेत रूजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची (१९८२-८४) ची जुनी पेंशन बंद करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. जुनी पेंशन योजनेमध्ये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर व मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या परिवाराला सुरक्षितता होती. मात्र जुनी पेंशन योजना कर्मचाऱ्यांचे अथवा त्यांच्या कुटुंबियाचे कोणतेही भविष्य नाही. त्यामुळे ही योजना घातक व फसवी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. येथील आझाद बागेत सर्व कर्मचारी जमा झाले. त्यानंतर मोर्चा निघाला. गांधी चौक, जयंत टाकीज चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुषांत निमकर, सचिव निलेश कुमरे, कार्याध्यक्ष प्रशांत खुसपुरे, उपाध्यक्ष अविनाश चवले व योगराज भिवगडे, भालचंद्र धांडे, श्रीकांत पोडे आदी उपस्थित होते.