शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या मोहिमेतही एव्हरेस्टवर चंद्र्रपूरचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:50 IST

आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्यातील सुरज आडे व अंतू कोटनाके यांचा समावेश होता. एव्हरेस्टवीरांचे आज चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमिशन शौर्य : एव्हरेस्टवीर सूरज आडे, अंतु कोटनाके यांचा जिल्हा प्रशासनाकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्यातील सुरज आडे व अंतू कोटनाके यांचा समावेश होता. एव्हरेस्टवीरांचे आज चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर आदी उपस्थित होते. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी मिशन शौर्य मोहीम सुरू केली होती. मिशनच्या पहिल्या मोहिमेत कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी २०१८ च्या मे महिन्यात एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. यावर्षी दुसºया मोहिमेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील अमरावती, पालघर, धुळे, नाशिक या पाचही जिल्ह्यातील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यातील ९ विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने एव्हरेस्ट शिखर सर करून राज्याचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणारे सुरज आडे व अंतूबाई कोटनाके यांचाही यात समावेश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत देवाडा शासकीय आश्रमशाळेत शिकणाºया सुरज आडे याने या मोहिमेत २३ मे २०१९ रोजी पहाटे ३.३५ वाजता एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. सुरज हा कोरपना तालुक्यातील रूपापेठ या गावचा रहिवासी आहे. त्याचे १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सुरजचे आई-वडील शेतकरी आहे.शासकीय आश्रम शाळा जिवती शाळेत शिकणारी अंतू कोटनाके हिने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. अंतू या मुलीला आई वडील नाहीत. ती आपल्या नातेवाईकांकडे राहते. जिवती तालुक्यातील आसापूर या गावची रहिवासी असून तिचे ११ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. या विद्यार्थ्यांना प्रारंभीचे प्रशिक्षण वर्धा येथील ज्ञानभारती कौशल्य विकास केंद्रात त्यानंतर हैदराबाद मधील भोंगिर येथे नंतर दार्जीलिंग तसेच सिक्कीममध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्याचा पुन्हा एकदा नावलौकिक वाढला. आज त्यांचे चंद्रपूरमध्ये आगमन होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.आदिवासी शेतकरी मुलाचा पराक्रमदेवाडा शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या सुरज आडे या विद्यार्थ्याने २३ मे २०१९ रोजी पहाटे ३.३५ वाजता एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. सुरज हा कोरपना तालुक्यातील रूपापेठ या गावचा रहिवासी असून १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले. त्याचे आई-वडील शेतकरी आहे.अंतुचा नातेवाईकांना अभिमानशासकीय आश्रम शाळा जिवती शाळेत शिकणारी अंतू कोटनाके हिने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. अंतूला आई-वडील नाहीत. आपल्या नातेवाईकाकडे ती राहते. जिवती तालुक्यातील आसापूर या गावची रहिवासी असून तिचे ११ वीचे शिक्षण झाले आहे.