शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या मिरवणुकीने दुमदुमले चंद्रपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:23 IST

इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त चंद्रपुरात बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दुमदुमले. यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला.

ठळक मुद्देउत्साहाचे वातावरण : हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त चंद्रपुरात बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहर दुमदुमले. यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला.ईद ए मिलादनिमित्त बुधवारी सकाळपासूनच चंद्रपुरात उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीची सुरुवात सकाळी १० वाजता गांधी चौकातून करण्यात आली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून परत जटपुरा गेट, गिरणार चौक अशी मिरवणूक फिरल्यानंतर दारुल मोहम्मदिया मस्जिद दादमहल वॉर्ड येथे विसर्जित झाली. या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्वांनी लंगरचा लाभ घेतला.ठिकठिकाणी स्वागतमिरवणुकीच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्रीच प्रमुख मार्गावर मंच उभारण्यात आले होते. बुधवारी मिरवणूक निघताच विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मसालेभात व सरबतही वितरण करण्यात आले.युवकांची स्वच्छता मोहीममिरवणुकीदरम्यान होणारा कचरा तत्काळ स्वच्छ करण्यासाठी युवकांची एक चमू कार्यरत होती. मिरवणूक ज्या मार्गावरून गेली, त्या मार्गावर हे युवक स्वच्छता मोहीम राबवित होते. त्यामुळे मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर लगेच शहर स्वच्छ दिसत होते.