शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

चंद्रपूर जिल्हा कोरोनाच्या दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये काढलेल्या आदेशांमध्ये सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना यामध्ये जलतरण तलाव, नाटयगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खर्रा विक्री केंद्र बंद करण्याचा आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकेवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू : सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स व इतर आस्थापना बंद करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या रोगाचा वाढता प्रादुर्भाव बघता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकही सध्या दहशतीखाली असून स्वच्छतेची काळजी घेऊ लागले आहेत. चित्रपटगृहे, नाटयगृहे, मॉल, जलतरण तलाव या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान १० विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात आली असून ते सर्व निगेटिव्ह ( धोक्याबाहेर ) आढळून आले. शनिवारी रात्री उशिरा चार संशयित रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयातदाखल करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल बाकी असून आतापर्यंत जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये काढलेल्या आदेशांमध्ये सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना यामध्ये जलतरण तलाव, नाटयगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खर्रा विक्री केंद्र बंद करण्याचा आदेश दिले आहेत. दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू, औषधी दुकान या आदेशातून वगळण्यात आले असून लग्न समारंभापासून तर गर्दी होऊ शकणाऱ्या सर्व योजनांना रद्द करण्याचे, पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध महाकाली मातेची यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होत असते. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी ही यात्रा रद्द झाल्याबाबत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनादेखील माहिती पुरविण्याचे सर्व भक्तांना निर्देशित करण्यात आले आहे. शहरांमध्ये विदेशातून येणाºया प्रत्येक नागरिकाची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाने अतिशय कडक निर्बंध राखले असून या अनुषंगाने शाळा, कॉलेज व गर्दीचे आयोजन बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आजार पसरणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात उदभवू नये, याकरिता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस एन मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांची नियुक्ती सनियंत्रक म्हणून करण्यात आलेली आहे.संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीगृहविभाग, महसूल विभाग यांचे संपर्क अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर हे असणार आहे. आरोग्य विभाग, रेडक्रॉस, लायन्स क्लब, रोटरी क्लब व इतर सेवाभावी संस्था, शिक्षण अधिकारी माध्यमिक, प्राथमिक या विभागाचे संपर्क अधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, जिल्हा परिषद चंद्रपूर, महानगरपालिका चंद्रपूर, सर्व नगरपरिषद या विभागाचे संपर्क अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी जे. पी .लोंढे हे असणार तर अन्न व प्रशासन विभागाचे संपर्क अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन हे असणार आहेत. या सर्व संपर्क अधिकारी यांना निवडून दिलेल्या विभागाशी संपर्कात राहून त्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे वेळोवेळी सादर करायची आहे.कोचिंग क्लासेस बंद ठेवाजिल्हाभरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित असतात. विद्यार्थ्यांच्या जीविताला कुठल्याही पद्धतीचा धोका संभवू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच राहणे योग्य असून या काळात सर्व कोचिंग क्लासेसच्या मालकांनी, संचालकांनी शासनाला सहकार्य करावे. या कालावधित कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावे ,असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.अफवा पसरविल्यास होणार कारवाईकोरोना विषाणू संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर मार्गाने अफवा पसरविणाºयांवर कारवाई होणार आहे. या सर्व हालचालींवर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. काही चुकीच्या बातम्या, पोस्ट, सोशल मीडियावर दिली गेल्यास अशा चुकीच्या बातम्या पसविणाऱ्या सोशल मीडियावरील ग्रुपचे अ‍ॅडमीन, वेबसाईटचे कथित पत्रकार व माध्यम प्रतिनिधीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लक्ष वेधण्याचे निर्देश सायबर सेलला दिले आहे.विविध कार्यक्रमांवर बंदीआपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाºया दुकानांना परवानगी असेल. याव्यतिरिक्त लग्नसमारंभ, आठवडी बाजार यांना काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये परिसर स्वच्छ ठेवणे, सतत हाताळल्या जाणाऱ्या वस्तू जसे दरवाज्याचे हॅन्डल, टेबले, खुर्ची, जीन्यावरील रेलिंग इत्यादींची वारंवार स्वच्छता ठेवणे, स्वच्छता करताना चांगल्या दर्जाचे सॅनीटायझर वापरणे, स्वच्छता कर्मचाºयांना वैयक्तिक दजार्चे संरक्षणासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात पुरविणे, कार्यक्रमाचा कालावधी अनावश्यक वाढवू नये अशा मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

टॅग्स :corona virusकोरोना