शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीत चंद्रपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:25 IST

राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली.

ठळक मुद्दे६९ लाख ८४ हजार ४२१ वृक्ष लागवड नांदेड पहिल्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली. ही नोंद राज्यात तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे.राज्याचे वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी गेल्या तीन वषार्पासून वृक्षलागवडीचा विक्रम राज्यात केला आहे. पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी तर तिसऱ्या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे आवाहन त्यांनी केले होते. या मोहिमेला यावर्षी सर्वाधिक प्रतिसाद नांदेड जिल्ह्याने दिला आहे. त्या पाठोपाठ मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याचा क्रमांक येतो. ३१ दिवसांमध्ये सर्वाधिक वृक्षलागवडीची नोंद ५ जुलैला करण्यात आली. जिल्हयात या दिवशी ४ लाख ८९ हजार १०२ वृक्षलागवड झाली होती.राज्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, चार दिवस आधीच ही वृक्षलागवड १३ कोटींच्यावर गेली. राज्यामध्ये दुपारी ४ वाजतापर्यंत १४ कोटी ७१ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आल्याचे जाहिर केले. यामध्ये चंद्रपूरचा देखील मोठा हातभार असल्याचे समाधान जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले असून सहभागी सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त मानले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विभागवार वृक्ष लागवड३१ दिवसात वनविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार वनविभागाने ३१ जुलैपर्यंत ३१ लाख १० हजार ३७५ वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने १४ लाख ५१ हजार ३८ वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत ९ लाख ८५ हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३ लाख ६६ हजार ३२४ वृक्ष लावले आहे. शैक्षणिक संस्थांनी १ लाख ४२ हजार, कृषी विभागाने २ लाख ४९ हजार वृक्षलागवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख १४ हजार, नगर विकास विभागाने १ लाख २१ हजार वृक्षलागवड करुन उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार