शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघांच्या हल्ल्यात इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:29 IST

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देझुडूपात धरला होता दबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली. आपल्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी हा इसम गेला असता झुडूपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने वाघाला परतवून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र वाघाने त्याच्या डाव्या हाताला व पाठीवर पंजे मारून त्याला जखमी केले. हा हल्ला होत असताना केलेल्या आरडाओरड्याला ऐकून जवळपासचे लोक तेथे धावून आले व त्यांनी वाघाला पिटाळून लावले.लालाजी मेश्रामला तात्काळ गुंजेवाहीच्या प्राथमिक केंद्रात आणले व तेथून त्याला सिंदेवाहीला पाठवण्यात आले.

टॅग्स :Tigerवाघ