शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल व पोंभूर्ण्यात वायफायसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:27 IST

चंद्रपूर जिल्हा ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यात आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव सादर करावा : सुधीर मुनगंटीवार यांच्या संबंधित यंत्रणेला सूचना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यात आणखी भर पडणार आहे. चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा ही शहरे लवकरच वायफाययुक्त होणार आहे. यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तीन आठवड्यात यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.मुंबईत शनिवारी सिस्कोच्या वतीने यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह सिस्कोचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जगभरातील बेस्ट प्रॅक्टीसेसचा अभ्यास करून या माध्यमातून कोणत्या सेवा नागरिकांना देता येतील, यासाठी किती खर्च येईल, याची माहिती देणारा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. कौशल्य विकास, ई-मेडीसीन, ई-लर्निंग, जनजागृतीचे कार्यक्रम, वनउपजावर प्रक्रिया करून करता येणाऱ्या गोष्टी, यासंबंधीचे विश्वातील ज्ञान या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. कौशल्य विकास, मुद्रा बँक व रोजगार संधीच्या विकासासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करून घेता आला पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ देऊन कौशल्य विकासाच्या संधींचा विस्तार करता आला पाहिजे. याचा विचार करून युनिक मॉडेलची यासाठी निवड करावी. सर्वसामान्य माणसांच्या हातातील स्मार्ट फोन हाच या माध्यमातून सुसंवादाचा आणि विकासाचा दुवा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.