शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:08 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील या कारभाराविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसमस्या दूर करा : जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील या कारभाराविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, नगरसेविका सुनिता लोढीया, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकीर, देवराव पाटील धोटे, महिला शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, असंघटित कामगार विभाग जिल्हा सरचिटणीस हरिदास लांडे, फारुक सिद्दीकी, शालिनी भगत, वंदना भागवत, बळीराज धोटे, संजय बुटले, शंकर बावणे, दीपक कटकोजवार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागील सहा महिन्यापासून रुग्णालयात दीडशेहून अधिक नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? रुग्णांना मोफत औषधी मिळत नाही. हफकीन नावाची कंपनी मर्यादा संपलेल्या औषधीचा पुरवठा करीत आहे. एका बेडवर दोन ते तीन रुग्ण ठेवण्यात येत आहे. डॉ. बी. डी. नाखले हे अधीक्षक आहे, मात्र ते कायमस्वरूपी नाही. कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यापासून वेतन नाही. आयसीयूमध्ये अव्यवस्था आहे. डॉक्टर पुरेसे नाही. पुरेसा स्टाफ नाही. यासारख्या अनेक समस्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शस्त्रक्रियेची सामुग्री निकृष्ट दर्जाची आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्या व नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वरील सर्व समस्या दूर न झाल्यास शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.