वरोरा : शेतकऱ्यांच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत गहाण असलेल्या शेतीची विक्री करून जमीन हडप करण्याचा प्रकार वरोरा तालुक्यात उघडकीस आला. शेतकऱ्यांची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात धनाढ्य व्यक्तीसह काही शासकीय कर्मचारी, अधिकारीही अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अत्यल्प भावात शेतीची विक्री करणाऱ्या १३ जणांवर बुधवारी वरोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. वरोरा तालुक्यात मागील काही वर्षापासून आर्थिकतेची कमतरता असणाऱ्या शेतकऱ्यांशी एक टोळके संपर्क साधत होते. त्यानंतर शेतकऱ्याला काही रक्कम द्यायची व शेती गहाण करुन घ्यायची. शेती गहाणला काही महिन्याचा कालावधी लोटताच शेती रजिस्ट्री करावी लागत असल्याचा बहाना करुन संपूर्ण शेताची अल्प किंमतीत रितसर विक्री करुन घेतली. मात्र शेती विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती काहीच आले नाही. अनेक शेतकरी कुटुंब मोक्यावरची शेती विकून उघड्यावर आले. शेत जमीन अत्यल्प दरात विक्री करून घेण्याचा व्यवसाय तेजीत आल्याने अनेक व्यक्ती यात गुंतले. त्यामुळे हा व्यवहार करणारे मोठे रॅकेट वरोरा परिसरात कार्यरत असल्याचे मानले जात आहे. अनेक व्यक्तीनी मोक्याच्या जागा याच पद्धतीने विकत घेवून ठेवण्याची चर्चा शहरात सुरू आहे. सदर प्रकार मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे. परंतु, या रॅकेट मधील सदस्य अल्पावधीत गर्भ श्रीमंत झाले. परंतु वरोरा पोलिसात सहा शेतकऱ्यांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून १३ जणांवर गुन्हे दाखल केले. अनेक माफीया भूमिगत झाल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यातवरोरा पोलिसात ज्या सहा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या सहाही शेतकऱ्यांच्या शेताची विक्री वरोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून झाली. कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या एका व्यक्ती विरुद्ध वरोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी अशाच एका व्यक्तीविरुद्ध भद्रावती पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने वरोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मागील एक आठवड्यापासून येथील एका व्यक्तीने कामावर येणे बंद केले आहे.
जमीन विक्री प्रकरणात मोठे मासे अडकण्याची शक्यता
By admin | Updated: March 27, 2015 00:48 IST