शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

उघड्या रोहित्रामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री सुरुच चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. ...

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री सुरुच

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी उघड्यावरच अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी अगदी रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

चंद्रपूर : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे; परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीची खोळंबा

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

झोपडपट्टी परिसराचा विकास करावा

चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घर बांधून नागरिक राहतात. विशेषत: झोपडपट्टीचा परिसरही वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

पक्षांसाठी ठेवत आहे पात्रात पाणी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यातच जलाशयही आता आटत असल्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी शहरातील काही नागरिक पात्रामध्ये पाणी भरून ते पक्ष्यासाठी ठेवत आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे पक्षांची काही प्रमाणात का होईना, तहान भागत आहे.

परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पाऊल उचलले जात आहे. कार्यक्रमांवरही बंदी आली असून, परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिक परवानगी घेण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

झाडांना सकाळच्या वेळेस पाणी टाकावे

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना कंत्राटदारामार्फत पाणी टाकले जात आहे; मात्र सदर पाणी सकाळी ११ तसेच दुपारीही टाकले जात आहे. त्यामुळे झाडांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत आहे. त्यामुळे पाणी टाकताना सकाळच्याच वेळी पाणी टाकावे, अशी मागणी केली जात आहे.