कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका
चंद्रपूर : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील बापट नगर परिसरात तसेच आझाद बागेजवळील मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावर राहतात. याकडे लक्ष देऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाजारात गर्दी वाढली
चंद्रपूर : सध्या मकरसंक्रांत, तसेच लग्न समारंभाचे दिवस असल्यामुळे नागरिक बाजारात खरेदीसाठी
गर्दी करीत आहेत. त्यातच काही व्यावसायिक तसेच ग्राहक वाट्टेल तिथे आपले वाहन पार्क करीत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या गर्दीवरील नियंत्रणासाठी बाजार परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
--
उघड्यावरील अन्नपदार्थ टाळावे
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.