शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्या प्रस्तावित कोळसा खाणीला चालबर्डी ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

शेतजमीन विक्रीच्या व्हॅल्युएशनच्या विक्रीनुसार चारपट शेतीचा मोबदला. २५ वर्षांपर्यंत दरमहा ३० हजार रुपये मानधन व वार्षिक ३०० रुपये वाढ ...

शेतजमीन विक्रीच्या व्हॅल्युएशनच्या विक्रीनुसार चारपट शेतीचा मोबदला. २५ वर्षांपर्यंत दरमहा ३० हजार रुपये मानधन व वार्षिक ३०० रुपये वाढ देण्यात येईल, असे वेकोलीतर्फे सांगण्यात आले होते. गावकऱ्यांनी ही बाब नामंजूर केली.

ग्रामपंचायतीला कुठलीही पूर्वसूचना लिखित न देता, कार्यालयीन प्रोसेसनुसार परिपत्रक न देता प्रत्यक्ष गावात येऊन सुनावणी करण्यात आली. वास्तविक, कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे ही बाब गावकऱ्यांनी नामंजूर केली.

भूमिअधिग्रहण हे कोणत्या वर्षीच्या कायद्यानुसार करण्यात येईल, हे सांगण्यात आले नाही. जमिनीची खरेदी-विक्री ही कोणाच्या मार्फत करण्यात येणार वा एमडीओमार्फत खासगीकरणाद्वारे करण्यात येणार हे सांगण्यात आले नसल्यामुळे गावकरी द्विधामन:स्थितीत आहेत. जमिनीचा मोबदला म्हणून ५० लाख रुपये प्रति एकर व प्रति सात-बारा एक नोकरी देण्यात यावी, तरच वेकोलीला जमीन देण्यात येईल, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

वेकोलीमध्ये नोकरी देत असताना कुठलाही बेरोजगार वेकोलीच्या नियुक्ती आदेशावरच वेकोलीमध्ये जॉईन करावा. गावाच्या १०० टक्के शेतीचे अधिग्रहण करण्यात यावे. गावाच्या सीमेलगत गावातील रहिवासी शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.

भूमिहीन शेतकऱ्यांना संबंधित दोन हजार रुपये प्रति एकर महिना देणार, असे सांगण्यात आले होते, हे सुद्धा नामंजूर करण्यात आले. ‌वेकोलीमध्ये गावाचे पुनर्वसन असल्यामुळे व गावातील भूमिहीन शेतमजूर हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे ते बेरोजगार होणार आहेत. अशा सर्व कुटुंबातील बेरोजगार व्यक्तींना पुनर्वसन करीत असताना नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, ही बाब ठरावात नमूद आहे.

मौजा चालबर्डी (कों) येथील मूळ वास्तव्यात असलेल्या शेतकऱ्यांना नोकरीत प्रथम प्राधान्य देऊन रुजू करावे व स्थानिक प्रकल्पामध्ये नोकरी देण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. ज्या गावांमधील शेतजमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे, त्या गावांमधील ग्रामस्थसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी ज्ञानेश्वर मते, सचिन उपरे, श्रीकांत मत्ते, सुनील दानव, पंढरी चावले, किशोर उपरे, श्यामराव उपरे, विकास उपरे, बंडू झाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.