शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

By admin | Updated: September 27, 2016 00:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत.

हंसराज अहीर : भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावाचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. भाजपप्रणित महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू करून त्या योजना सर्व स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केला असला तरी या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याची व या योजनांचा लाभ गावागावातील लाभार्थ्यांना मिळवून देण्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गोंडपिपरी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. २२ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथील धनोजे कुणबी सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, भाजपा नेते बबनराव निकोडे, निलेश खरबडे, नगर पचायत अध्यक्ष संजय झाडे, अशोक चिचघरे, किशोर अगस्थी, राकेश पुंज, रामदास शेंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगर पंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.अवघ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे देशाच्या विकासामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले असून देश विकासाच्या दिशेने झेपावला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टी व दृढ संकल्पाचा हा परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच घटकांचे योगदान असल्याखेरीज राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही. ही भूमिका ठेवून प्रधानमंत्री यांनी रोजगार व स्वयंरोजगारावर भर देऊन प्रत्येक हाताला काम देण्याचे धोरण स्वीकारले असून येत्या पाच वर्षात त्यांचे हे स्वप्न साकार होतील, असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. शेती, उद्योग व अन्य संरचनांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणून त्या योजनांची अंमलबजावणी सक्तीपूर्वक करण्यास प्राधान्य दिले असले तरी भाजपप्रणित सरकारच्या या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्र्त्यांंनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. भाजपाची सहकार क्षेत्रात भक्कमपणे उभारणी करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हातात सोपविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज असल्याचे सांगत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्र्यांची तसेच मुख्यमंत्र्यांची ‘सक्षम भाजप सक्षम भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुकामध्ये पक्षाला फार मोठे यश संपादन होईल, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.