शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील ओबीसींची जनगणना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:47 IST

देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. २०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.२०१० रोजी झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी, सन २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसी वर्गाची जातनिहाय जनगणना करावी, सरकारी नोकरीतील ओबीसी, एससी व एसटी प्रवर्गाचा अनुशेष विशेष अभियान राबवून तातडीने भरावा, एससी व एसटी प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्र्थ्याना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, आर्थिक व सामाजिक विकासासाठी ओबीसी समाजाला संविधानातील तरतुदीनुसार न्याय द्यावा. एससी व एसटीप्रमाणे ओबीसी शेतकरी व शेतमजुरांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा देण्यात यावा, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे, कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करू नये, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना देण्यात आले. निवेदन देताना अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, मोंटू पिलारे, मकरंद राखडे, भाऊराव राऊत, राकेश शेंडे, किशोर हजारे, दामोदर बहेकार, मिथुन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, ज्ञानेश्वर बागमारे, सुदाम राठोड, चंदू बुल्ले, अरविंद नागोसे, रवींद्र,्र तलमले, डाकराम ठाकरे, वामनराव उके, प्रेमराज दर्वे आदी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण