शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

अंध विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी

By admin | Updated: February 21, 2017 00:35 IST

युगप्रवर्तक छत्रपति प्रतिष्ठान भद्रावतीतर्फे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती रविवारला घोडपेठ येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आली.

गरजंंूना वस्तूंचे वितरण : युगप्रवर्तक छत्रपती प्रतिष्ठानचे आयोजनघोडपेठ : युगप्रवर्तक छत्रपति प्रतिष्ठान भद्रावतीतर्फे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती रविवारला घोडपेठ येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, प्रेरणा अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक गजविंद्र भोयर, संतोष देरकर, संतोष ईटनकर, वतन लोणे, युगप्रवर्तक छत्रपती प्रतिष्ठानचे अतुल कोल्हे, रोहन खुटेमाटे आदी उपस्थित होते.रविवारी सकाळी भद्रावती येथील नागमंदिर ते नगरपरिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. त्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात भद्रावतीतील युवती व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही पालखी ढाल - तलवार, पताका व भगव्या ध्वजांनी सुशोभित तसेच पारंपारिक पद्धतिने नटलेली दिसत होती. दुपारी घोडपेठ येथील अंध विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले. विद्यार्थ्यांना दररोज वापरात येणाऱ्या गरजेच्या वस्तू व फळवाटप केले. विद्यार्थ्यांसमवेत सामूहिक भोजनही केले. स्वयंसेवकांतर्फे विद्यालयाला छत्रपतींचा फोटो भेट देण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रतिक्षा कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षिरसागर, भुमिका आसुटकर, प्रांजली लांबोळे, मनिषा लांबोळे, खुशी सावरकर, नम्रता लांडगे, खाडे, शेडामे, डाखरे, प्रमोद कुटेमाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.(वार्ताहर)रिपब्लिकन सेनेच्यावतीने शिवजयंती साजरीचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य स्थानिक रिपब्लिकन कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुले तथा आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष राजेश वनकर, धम्मप्रकाश देवगडे, संदीप सोनोने, जहीर कादरी, विकास रंगारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.