शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

जागतिक महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल ...

न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर

चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हरिहर भांडवलकर, प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती डाॅ. विद्या बांगडे आणि पर्यवेक्षिका बैद यांची उपस्थिती होती. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक तथा शैक्षणिक कार्यात अग्रणी, चंद्रपूर स्मार्ट सिटी या संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. विद्या बांगडे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य भांडवलकर यांनी मार्गदर्शन केेले. पर्यवेक्षिका बैद, पडवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन शुक्ला यांनी केेले. आभार अनिता बोबडे यांनी मानले.

फोटो

विठाई बहुउद्देशीय संस्था

चंद्रपूर : येथील विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहर पोलीस स्थानक, रामनगर पोलीस स्थानक, वाहतूक नियंत्रण कक्ष, तुकुम येथील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष महेश काहिलकर, उपाध्यक्ष संजीवनी कुबेर, पोलीस निरीक्षक रामटेके, वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, कोषाध्यक्ष दिनेश जुमड़े, सदस्य गणेश दाते, राम सावरकर, उपाध्यक्ष संजीवनी कुबेर, सदस्य भारती कश्यप, प्रीतम रागीट, संजीदा शेख इत्यादी उपस्थित होते.

-

फोटो

जिल्हा परिषद वित्त विभाग

चंद्रपूर : जिल्हा परिषद वित्त विभागामध्ये अध्यक्षस्थानी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रीती खारतुडे, लेखा अधिकारी विजय पिदूरकर, दीपक जेऊरकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय मार्गदर्शनात अशोक मातकर यांनी महिलांचे कार्यालयातील व कुटुंबातील महत्त्वाचे योगदान व त्यांचे समर्पणाबाबत उल्लेख करून विशेष गौरव केला. यावेळी प्रीती खारतुडे, स्वाती कुलकर्णी, रिमा सोरते, रूपा राजपुरोहित, गायत्री खोब्रागडे, शारदा मेश्राम, अंजुषा जीवने यांचा सत्कार करण्यात आला. संचालन पियुष भांदककर यांनी केले. अमित घोरसारिया यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी खुशाल अंडरस्कर, धर्मपाल आलोने, मंगेश वाघाडे, सुधाकर देवतळे, अनिल वाडगुरे व सूर्यभान माणूसमारे आदींनी परिश्रम घेतले.

-

फोटो

भवानजीभाई चव्हाण विद्यालय

चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार, प्रमुख पाहुण्या तथा मार्गदर्शक म्हणून चंदा ढबाले, सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच उपमुख्याध्यापक सी. बी. टोंगे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा नीमा लोहे आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक लोहे यांनी केले. यावेळी चंदा ढबाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन धोटे यांनी केले. आभार ढवस यांनी मानले.

यावेळी पर्यवेक्षिका सहारे, राऊत, पर्यवेक्षक विधाते तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---

फोटो

डोंगरहळदी जि.प.शाळा, डोंगळहळदी

पोंभुर्णा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरहळदी तुकूम येथे शाळा आणि बचत गटांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सरपंच संगीता कुळमेथे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जे. डी. पोटे, सहाय्यक शिक्षक भोजराज चिमुरकर, महिला बचत गटाच्या रेणुका ओंझेलवार, पुष्पा बुरांडे, मोहिनी सोमनकर, अंगणवाडी शिक्षिका निरुता बुरांडे, वैभवी बुरांडे, शिला सोमनकर, संध्या सोमनकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक पोटे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक चिमूरकर तसेच रेणुका ओंझेलवार यांनी महिलांचे समाजात असलेले स्थान याविषयी माहिती दिली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कुळमेथे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन व आभार पुष्पा बुरांडे यांनी मानले. यशस्वितेसाठी उज्ज्वला बुरांडे, लीला सोमनकर, सुनंदा शेडमाके आदिंनी सहकार्य केले.