शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जागतिक महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल ...

न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर

चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्षस्थानी प्राचार्य हरिहर भांडवलकर, प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती डाॅ.विद्या बांगडे आणि पर्यवेक्षिका बैद यांची उपस्थिती होती. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक तथा शैक्षणिक कार्यात अग्रणी, चंद्रपूर स्मार्ट सिटी या संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.विद्या बांगडे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य भांडवलकर यांनी मार्गदर्शन केेले. पर्यवेक्षिका बैद, पडवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन शुक्ला आभार अनिता बोबडे यांनी मानले.

फोटो

विठाई बहुउद्देशीय संस्था

चंद्रपूर : येथील विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन, वाहतूक नियंत्रण कक्ष, तुकुम येथील सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष महेश काहिलकर, उपाध्यक्ष संजीवनी कुबेर, पोलीस निरीक्षक रामटेके, वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, कोषाध्यक्ष दिनेश जुमड़े, सदस्य गणेश दाते, राम सावरकर, उपाध्यक्ष संजीवनी कुबेर, सदस्य भारती कश्यप, प्रीतम रागीट, संजीदा शेख इत्यादी उपस्थित होते.

-

फोटो

जिल्हा परिषद वित्त विभाग

चंद्रपूर : जिल्हा परिषद वित्त विभागामध्ये अध्यक्षस्थानी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रीती खारतुडे, लेखा अधिकारी विजय पिदूरकर, दीपक जेऊरकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय मार्गदर्शनात अशोक मातकर यांनी महिलांचे कार्यलयातील व कुटुंबातील महत्त्वाचे योगदान व त्यांचे समर्पणाबाबत उल्लेख करून विशेष गौरव केला. यावेळी प्रीती खारतुडे, स्वाती कुलकर्णी, रीमा सोरते, रूपा राजपुरोहित, गायत्री खोब्रागडे, शारदा मेश्राम, अंजुषा जीवने, यांचा सत्कार करण्यात आला. संचालन पीयूष भांदककर, आभार अमित घोरसारिया यांनी केले. कार्यक्रमासाठी खुशाल अंडरस्कर, धर्मपाल आलोने, मंगेश वाघाडे, सुधाकर देवतळे, अनिल वाडगुरे व सूर्यभान माणुसमारे आदींनी परिश्रम घेतले.

-

फोटो

भवानजीभाई चव्हाण विद्यालय

चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी.डी. तंन्नीरवार, प्रमुख पाहुण्या तथा मार्गदर्शक म्हणून चंदा ढबाले, सहायक धर्मादाय आयुक्त, तसेच उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा निमा लोहे आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक लोहे यांनी केले. यावेळी चंदा ढबाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सी.डी. तंन्नीरवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन धोटे, आभार ढवस यांनी मानले.

यावेळी पर्यवेक्षिका सहारे, राऊत, पर्यवेक्षक विधाते, तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो

जि.प.शाळा डोंगळहळदी

पोंभूर्णा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरहळदी तुकूम येथे शाळा आणि बचत गटाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सरपंच संगीता कुळमेथे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जे.डी. पोटे, सहायक शिक्षक भोजराज चिमुरकर, महिला बचत गटाच्या रेणुका ओंझेलवार, पुष्पा बुरांडे, मोहिनी सोमनकर, अंगणवाडीशिक्षिका निरुता बुरांडे, वैभवी बुरांडे, शीला सोमनकर, संध्या सोमनकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक पोटे मार्गदर्शन केले. स. शिक्षक चिमुरकर, तसेच रेनुका ओंझेलवार यांनी महिलांचे समाजात असलेले स्थान याविषयी माहिती दिली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कुळमेथे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन व आभार पुष्पा बुरांडे यांनी मानले. यशस्वितेसाठी उज्ज्वला बुरांडे, लीला सोमनकर, सुनंदा शेडमाके आदींनी सहकार्य केले.