चंद्रपूर : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची ७२ वी जयंती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. मुख्य अभियंता घुगल यांच्यासह सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेतलीयाप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल घोघरे, कार्यकारी अभियंता ए. डी. सहारे, कार्यकारी अभियंता अनिल काळे, कार्यकारी अभियंता (ग्राहक तक्रार निवारण मंच) पी.एम. किरनाके, प्रणाली विश्लेशक पंकज साटोने, सहायक मुख्य व्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुनील पिसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महावितरणमध्ये सद्भावना दिवस साजरा
By admin | Updated: August 24, 2016 00:35 IST