शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना घेऊन पालिकेत धडक

By admin | Updated: August 10, 2015 00:36 IST

नव्यानेच स्थापन झालेल्या चिमूर नगर परिषद क्षेत्रातील कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून कोंडवाड्यातील जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

चिमूरच्या कोंडवाड्याची दुरवस्था : प्रशासनाप्रति नागरिकांत असंतोषचिमूर : नव्यानेच स्थापन झालेल्या चिमूर नगर परिषद क्षेत्रातील कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून कोंडवाड्यातील जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. १९ जुलैला गोहत्या करण्यासाठी जात असताना जागरुक युवकांनी जनावरे पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यावर कोंडवाड्यात टाकण्यात आले. परंतु कोंडवाड्याची दयनीय अवस्था असल्याने जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सामाजीक कार्यकर्ते विनोद शर्मा यांनी जनावरे चक्क नगर परिषद कार्यालयात आणून राग व्यक्त केला.ब्रह्मपुरी तालुक्यातून ट्रकमधून जनावरे कत्तलखान्यात जात असताना येथील जागरुक युवकांनी पाठलाग करुन ट्रक पकडला. ती जनावरे पोलिसांच्या स्वाधीन केली. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ७ आॅगस्टला सुपूर्तनाम्यावर जनावरे सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उज्वल गोरक्षण शाळा चंद्रपूर वतीने विनोद शर्मा यांनी ३१ हजार ५०० रुपयाचा दंड नगर परिषदमध्ये भरणा केल्यावर जनावरे सोडण्यात आली. परंतु नगर परिषद मधील कोंडवाड्यात सोयीसुविधा नसून जनावरांना चिखलातच रहावे लागते. जनावरांकडे लक्ष देण्यात येत नसून चारा टाकल्यात जात नसल्याचेही दिसून आले. याकडे येथील प्रशासकाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासकांना वारंवार सांगूनही याकडे डोळेझाक करीत असल्याने नगर परिषद स्तरावर प्रती जनावरांना दंड आकारत असताना त्या जनावरांना योग्य जागा, चारा तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी न करणे, पाण्याचा टाका असूनसुद्धा पाणी न भरणे असे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी उज्वल गोरक्षण शाळा चंद्रपूरचे चिमूर तालुका प्रभारी विनोद शर्मा यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)